एम्सच्या नर्सशी FB द्वारे मैत्री करून बलात्कार; आरोपी झाकीर नाईकचा 'फॉलोअर' असल्याचा पीडितेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 11:36 IST2018-09-25T11:36:36+5:302018-09-25T11:36:53+5:30
दिल्ली पोलिसांनी केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या एका तरुणाला मुंबईतून अटक केली आहे.

एम्सच्या नर्सशी FB द्वारे मैत्री करून बलात्कार; आरोपी झाकीर नाईकचा 'फॉलोअर' असल्याचा पीडितेचा आरोप
नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या एका तरुणाला मुंबईतून अटक केली आहे. या तरुणावर एम्स रुग्णालयातील नर्सबरोबर फेसबुकवर मैत्री करून तिचा बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कार पीडितेनं पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये हा आरोप केला आहे. आरोपी अमल हा झाकीर नाईक याच्या विचारांनी प्रेरित होता. आरोपीनं फेसबुकवरच्या झाकीर नाईकच्या पोस्ट आणि व्हिडीओ पीडित नर्सला दाखवल्या होत्या.
पीडित नर्सनं सांगितलं की, दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान आरोपी जास्त करून झाकिर नाईकसंदर्भातच चर्चा करत होता. आता आरोपी अमलला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. दक्षिण दिल्ली पोलिसांऐवजी स्पेशल सेल आणि आयबीसुद्धा या प्रकरणात चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांनी महिलेच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरू आहे.