हरियाणात बलात्कारी पित्याला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 03:08 PM2023-10-09T15:08:33+5:302023-10-09T15:09:30+5:30

पीडितेला १०.५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. 

Rape father sentenced to death in Haryana | हरियाणात बलात्कारी पित्याला फाशीची शिक्षा

हरियाणात बलात्कारी पित्याला फाशीची शिक्षा

googlenewsNext

बलवंत तक्षक -

चंडीगड : हरियाणामध्ये आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडितेला १०.५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत राणा यांच्या न्यायालयाने बलात्कारी पित्याला फाशीची शिक्षा सुनावताना म्हटले आहे की, रक्षकच जेव्हा भक्षक होतो, तेव्हा त्याला समाजात कोणतेही स्थान उरत नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपीने चार वर्षे दुष्कृत्य केले. अशा स्थितीत न्यायालय त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत आहे.

या कालावधीत पित्याने तिला घरात बंधक बनवून ठेवले होते व ही बाब कुणाला सांगितली, तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही मुलगी साडेपंधरा वर्षाच्या वयात गर्भवती झाली. अखेर अत्याचार सहन न झाल्याने तिने कशीबशी स्वत:ची सुटका करवून  पाेलिसांत तक्रार केली हाेती.

Web Title: Rape father sentenced to death in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.