बलात्काराचा आरोपी तीनदा ‘पौरुषत्व चाचणी’त नापास, जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 10:48 IST2023-03-22T10:48:19+5:302023-03-22T10:48:31+5:30

आरोपी तीनदा पौरुषत्व चाचणीत नापास झाला. केवळ याच कारणामुळे तो अजूनही अविवाहित आहे, असे वकिलाने सांगितल्यानंतर न्यायालयाने धनक याला जामीन मंजूर केला.

Rape accused failed 'manhood test' thrice, granted bail | बलात्काराचा आरोपी तीनदा ‘पौरुषत्व चाचणी’त नापास, जामीन मंजूर

बलात्काराचा आरोपी तीनदा ‘पौरुषत्व चाचणी’त नापास, जामीन मंजूर

अहमदाबाद : एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ५५ वर्षीय मुक्त छायाचित्रकाराने तपासणीदरम्यान आपण तीनदा पौरुषत्व चाचणीत नापास झाल्याचे सांगितल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

२३ डिसेंबर २०२२ रोजी एका २७ वर्षीय महिलेने गुजरात विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर प्रशांत धनक या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याने मॉडेलिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. 

धनक याला शहर सत्र न्यायालयाने २ मार्च रोजी जामीन नाकारला होता आणि त्याच्याविरोधात खटला चालवण्यात आला होता. पोलिस तपासाचा एक भाग म्हणून वैद्यकीय परीक्षकांनी त्याची पौरुषत्व चाचणी घेतली, पण त्यात तो नापास झाला. मॉडेल त्याच्याकडून पैशांची मागणी करत होती, परंतु ते न मिळाल्याने तिने तक्रार दाखल केली.

आरोपी तीनदा पौरुषत्व चाचणीत नापास झाला. केवळ याच कारणामुळे तो अजूनही अविवाहित आहे, असे वकिलाने सांगितल्यानंतर न्यायालयाने धनक याला जामीन मंजूर केला.

Web Title: Rape accused failed 'manhood test' thrice, granted bail