शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

Ranya Rao: नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:32 IST

Ranya Rao Gold Smuggling Case: रान्या रावबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा पती जतिन हुक्कर याचं एक विधान आता समोर आलं आहे.

सोने तस्करी प्रकरणात कारवाईला सामोरे जाणाऱ्या रान्या रावबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा पती जतिन हुक्कर (Jatin Hukkeri) याचं एक विधान आता समोर आलं आहे. जतिन हुक्करकडून अटकेपासून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले.

११ मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने हुक्करवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले, कारण त्याला रान्या रावशी असलेल्या संबंधांमुळे ताब्यात घेतलं जाऊ शकते अशी भीती होती. सुनावणीदरम्यान हुक्करचे वकील प्रभुलिंग नवदगी यांनी न्यायालयाला सांगितलं की, जतिनने नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न केलं होतं परंतु डिसेंबरपासून त्यांच्यातील काही समस्यांमुळे ते अनौपचारिकपणे वेगळे राहत आहेत. पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार आहे.

रान्या रावचे वडील आणि आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांनी लग्नानंतर त्यांची मुलगी कुटुंबापासून दूर गेल्याचं म्हटलं होतं. रान्याला ३ मार्च रोजी दुबईहून सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आलं होतं आणि सध्या ती कोठडीत आहे. कनिष्ठ न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर  शनिवारी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. 

दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा

अभिनेत्रीने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतर 'वगाह' आणि 'पटकी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु अचानक ती इंडस्ट्रीतून गायब झाली. चित्रपटांमधून गायब झाल्यानंतर ती बेकायदेशीर कृत्य करू लागली. भारत आणि दुबईमधील सोन्याच्या किमतीतील फरकाचा फायदा घेण्यासाठी तिने सोन्याच्या तस्करी करणाऱ्या गँगशी हातमिळवणी केली आणि तस्करी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीGoldसोनंAirportविमानतळCourtन्यायालयKarnatakकर्नाटकHigh Courtउच्च न्यायालय