अश्लील विधानाचा वाद, रणवीर अलाहाबादिया कोर्टात; तीन दिवसांत सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 08:22 IST2025-02-15T08:22:34+5:302025-02-15T08:22:57+5:30

संबंधित प्रकरणावर तत्काळ सुनावणी घेण्यासाठी याचिकेचा तोंडी उल्लेख करण्याची परवानगी अलाहाबादियाचे वकील चंद्रचूड यांनी मागितली

Ranveer Allahabadia court for obscene remarks; Hearing in three days | अश्लील विधानाचा वाद, रणवीर अलाहाबादिया कोर्टात; तीन दिवसांत सुनावणी

अश्लील विधानाचा वाद, रणवीर अलाहाबादिया कोर्टात; तीन दिवसांत सुनावणी

नवी दिल्ली : एका यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात असभ्य व वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत आलेला इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 'इंडियाज गॉट लॅटेंट'या कार्यक्रमात अश्लील विधान केल्यामुळे अनेक राज्यांत अलाहबादिया व आणखी काही लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या प्रकरणावर दोन ते तीन दिवसांत सुनावणी होणार आहे.

एल्विश यादवला आयोगाची नोटीस
बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या व मिस अरुणाचल हा किताब मिळवणारी चुम दरांग तरुणीबद्दल वर्णद्वेषी वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली महिला आयोगाने सोशल मीडिया एन्फ्लएन्सर एल्विश यादवला नोटीस पाठवली. आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश यादवला दिले आहेत.

‘त्या’ अकाउंटवर कारवाई
कुंभमेळ्याबद्दल चुकीची माहिती व गैरसमज पसरवणाऱ्या ५३ सोशल मीडिया अकाउंटविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली आहे. 

आई-वडील व लैंगिक संबंधाबद्दल वादग्रस्त वक्तव्य
संबंधित प्रकरणावर तत्काळ सुनावणी घेण्यासाठी याचिकेचा तोंडी उल्लेख करण्याची परवानगी अलाहाबादियाचे वकील चंद्रचूड यांनी मागितली. मात्र, तसे करता येणार नसल्याचे स्पष्ट करत सरन्यायाधीश संजीव खन्ना व न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. 
दोन किंवा तीन दिवसांत सुनावणी केली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘इंडियाज गॉट लॅटेंट' कार्यक्रमात आई-वडील व लैंगिक संबंधाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अलाहाबादियाविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 

 

Web Title: Ranveer Allahabadia court for obscene remarks; Hearing in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.