"दुर्घटनाग्रस्त एअर अ‍ॅम्ब्युलन्स विमानात 'ब्लॅक बॉक्स' नव्हता..."; तपास अधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 07:53 IST2026-02-25T07:53:03+5:302026-02-25T07:53:53+5:30

दिल्लीस्थित रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे हे विमान रांची ते दिल्ली एअर अ‍ॅम्ब्युलन्स होते.

ranchi plane crash: "There was no black box in the crashed air ambulance at Ranchi..."; Information from investigating officers | "दुर्घटनाग्रस्त एअर अ‍ॅम्ब्युलन्स विमानात 'ब्लॅक बॉक्स' नव्हता..."; तपास अधिकाऱ्यांची माहिती

"दुर्घटनाग्रस्त एअर अ‍ॅम्ब्युलन्स विमानात 'ब्लॅक बॉक्स' नव्हता..."; तपास अधिकाऱ्यांची माहिती

रांची -  झारखंडच्या चतरामधील सिमरिया येथे रांचीहून दिल्लीच्या दिशेने जाणारी एअर अ‍ॅम्ब्युलन्स जंगलात कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या विमानातून प्रवास करणाऱ्या ७ जणांचा मृत्यू झाला. आता या दुर्घटनेत नवीन माहिती समोर येत आहे. जे विमान खाली कोसळले त्यात ब्लॅक बॉक्स नव्हता. त्यामुळे विमानाचा अपघात कसा झाला हे शोधणे कठीण आहे असा गौप्यस्फोट या घटनेशी निगडित एका अधिकाऱ्याने केला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

माहितीनुसार, नागरी वाहतूक नियमानुसार ५७०० किलो पेक्षा कमी वजन असणाऱ्या विमानांसाठी कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर(CVR) आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर(FDR) हे असणं बंधनकारक नाही. मात्र एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेला संपर्क, दुर्घटनाग्रस्त विमानचा मलबा आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या जबाबाबवर या अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास होऊ शकतो असं एका तज्ज्ञाने सांगितले. 

तपास अधिकाऱ्यांनी काय म्हटलं?

तपास यंत्रणा ज्या पैलूंवर तपास करताहेत, त्यात एक दावा असाही आहे की विमानात असलेल्या खराब हवामान रडारवरमुळे हे विमान त्याच्या मार्गातून भरकटले होते. एअर इंडिया आणि इंडिगो यांच्याकडून झालेल्या २ उड्डाणांनाही याच मार्गावर खराब हवामानाचा सामना करावा लागला होता आणि त्यांनी यातून वाचण्यासाठी मार्ग बदलण्याची विनंती केली होती. इंडिगोच्या विमानाने डावीकडे वळण्याची विनंती केली तर अपघातग्रस्त विमानाने उजवीकडे वळण्याची विनंती केली. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त विमानावरील हवामान रडार योग्यरित्या काम करत आहे की नाही याची चौकशी सुरू आहे असं एका अधिकाऱ्याने सांगितले. रडारवर दाखवलेल्या परिस्थितीचा क्रूने चुकीचा अर्थ लावला आहे की रडारमध्येच काही बिघाड आहे हे तपासणे आवश्यक आहे.

हे विमान कधी आणि कोणाकडून खरेदी करण्यात आले?

दिल्लीस्थित रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे हे विमान रांची ते दिल्ली एअर अ‍ॅम्ब्युलन्स होते. या विमानात रुग्ण संजय कुमार (४१), एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, दोन अटेंडेंट आणि दोन पायलट होते. पायलट-इन-कमांड विवेक विकास भगत यांना अंदाजे १,४०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता आणि फर्स्ट ऑफिसर सवराजदीप सिंग यांना अंदाजे ४५० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. १९८७ मध्ये बांधलेल्या रेडबर्ड एअरवेजने २००१ मध्ये ओरिएंट फ्लाइंग स्कूलकडून हे विमान विकत घेतले.

Web Title : दुर्घटनाग्रस्त एयर एम्बुलेंस में ब्लैक बॉक्स नहीं; जांच जारी

Web Summary : झारखंड के चतरा में दुर्घटनाग्रस्त एयर एम्बुलेंस में ब्लैक बॉक्स नहीं था, जिससे जांच मुश्किल हो गई है। खराब मौसम रडार का संदेह है। 1987 का विमान, एक मरीज और चालक दल को लेकर दिल्ली जा रहा था। पायलट अनुभव और विमान इतिहास की जांच की जा रही है।

Web Title : Crashed Air Ambulance Lacked Black Box; Investigation Continues

Web Summary : The air ambulance that crashed in Chatra, Jharkhand, lacked a black box, complicating the investigation. Defective weather radar is suspected. The 1987 plane, carrying a patient and crew, was en route to Delhi. Pilot experience and aircraft history are under scrutiny.