शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मी गुन्हेगार आहे, मान्य करतो, पण...", रामपूरमध्ये मतदानादरम्यान आझम खान यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 09:04 IST

Lok Sabha Bypolls : रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे असीम राजा आणि भाजपचे घनश्याम सिंह लोधी यांच्यात थेट लढत आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये आज (गुरुवारी) लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विजयानंतर येथील जागा रिक्त झाली होती. रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे असीम राजा आणि भाजपचे घनश्याम सिंह लोधी यांच्यात थेट लढत आहे. घनश्याम सिंह लोधी याआधी आझम खान यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र, त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

रामपूरमध्ये 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली, मात्र त्याआधीच आझम खान यांनी पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "मी रात्रभर जागे होतो. आमचे लोकसभेचे उमेदवार गंज पोलिस स्टेशन (पीएस), कोतवाली पीएस, सिव्हिल लाइन्स पीएस (रामपूरमध्ये) गेले होते. सर्वात अशोभनीय वर्तवणूक गंजच्या एसएचओची होती. हिंसाचारही केला... मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास प्रशासन जबाबदार असेल. याला सरकारही जबाबदार असेल."

याचबरोबर, समाजवादी पक्षाचे नेते पुढे म्हणाले की, "शहरात सर्वत्र जीप आणि सायरन होते. त्यांनी लोकांना पोलीस स्टेशनमध्ये नेले, त्यांना मारहाण केली आणि मी काही पैशांच्या ट्रान्सफरबद्दल देखील ऐकले आहे. हे लाजीरवाणे आहे. मी गुन्हेगार आहे, मला मान्य आहे... त्यामुळे माझे शहर सुद्धा असेच मानले गेले आहे. ते त्यांना हवे ते करू शकतात, आम्हाला सहन करावे लागेल. वाट पाहायची असेल तर त्रास सहन करावा लागतो."

रामपूर समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला रामपूर लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पक्षाचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. रामपूर हे दीर्घकाळापासून आझम खान यांच्या प्रभावाचे क्षेत्र आहे आणि पक्षाने रामपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आझम खान यांच्याकडे सोपवली आहे. रामपूर लोकसभा मतदारसंघात 17 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यात 50 टक्के हिंदू आणि 49 टक्के मुस्लिम मतदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांनी भाजप उमेदवार जया प्रदा यांचा एक लाख नऊ हजार 997 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश