रामनगर खालसाची साधुग्रामात मिरवणूक

By Admin | Updated: August 25, 2015 22:46 IST2015-08-25T22:46:40+5:302015-08-25T22:46:40+5:30

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाडे आणि खालशाचे ध्वजारोहण झाल्याने साधुग्राम गजबजले असून, संत- महंतांच्या मिरवणूक निघत आहेत. रामनगर खालशांच्या वतीने महंत कविरामदास महाराज यांच्या नगरप्रवेशानिमित्त मंगळवारी सायंकाळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रथावर आरूढ महंतांचा भाविकांनी जयघोष केला.

Ramnagar khalsa procession in sadhugram | रामनगर खालसाची साधुग्रामात मिरवणूक

रामनगर खालसाची साधुग्रामात मिरवणूक

शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाडे आणि खालशाचे ध्वजारोहण झाल्याने साधुग्राम गजबजले असून, संत- महंतांच्या मिरवणूक निघत आहेत. रामनगर खालशांच्या वतीने महंत कविरामदास महाराज यांच्या नगरप्रवेशानिमित्त मंगळवारी सायंकाळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रथावर आरूढ महंतांचा भाविकांनी जयघोष केला.
शाहीस्नान पर्वणीचा दिवस जवळ आल्याने साधुग्राममध्ये मैदानी कसरती आणि मैदानी खेळांच्या प्रदर्शनाने महंतांच्या काढण्यात आलेल्या मिरवणूक लक्षवेधी ठरत आहेत. गुजरातमधील सुरेंद्रर जिल्‘ातील रामनगर खालसाचे महामंडलेश्वर महंत कविरामदास महाराज यांची पंचवटीतील नागचौकातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक काळाराम मंदिरापासून निघून आडगावनाका, औरंगाबाद नाका, औरंगाबाद रोड मार्गे तपोवन-साधुग्राममध्ये आली. मिरवणुकीत साधू व भाविकांनी तलवार, छडी, प˜ा, भाले आदि शस्त्रांच्या सहाय्याने मैदानी खेळांचे प्रदर्शन केले. यावेळी साधूंचा जथ्या, भगवे ध्वजधारी भाविक, घोडेस्वार आणि बग्गीत बसलेले महंत भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी परशुरामदास महाराज व्यासमहाराज, नरेंद्रदास महाराज आदि मिरवणुकीत सहभागी होते.

Web Title: Ramnagar khalsa procession in sadhugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.