रामलाल यांना हटविले, वेलणकर राष्ट्रीय महासचिव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 04:31 IST2019-07-14T04:31:40+5:302019-07-14T04:31:49+5:30
भाजपच्या संघटनेत एक बदल झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटना) रामलाल यांना पदावरून दूर करण्यात आले आहे.

रामलाल यांना हटविले, वेलणकर राष्ट्रीय महासचिव
नवी दिल्ली : भाजपच्या संघटनेत एक बदल झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटना) रामलाल यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील सतीश वेलणकर यांना रामलाल यांच्या जागी नियुक्त करण्यात आले आहे.
आरएसएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल भाजप मध्ये संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या जागी वेलणकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. वेलणकर सध्या भाजपचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत. भाजप मध्ये प्रमुख रणनीतिकार या रुपात रामलाल हे संघ व पक्षामधील दुवा होते. भाजपच्या महत्वाच्या बैठकांमध्ये ते उपस्थित असत. ती जबाबदारी आता वेलणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. या शिवाय गोपाल आर्य यांना पर्यावरण कार्यक्रमांचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.