शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलमध्ये भाजपाला धक्का; माजी कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 16:40 IST

Ramlal Markanda : हिमाचलमधील जयराम सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या रामलाल मारकंडा यांनी राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशातभाजपाला मोठा धक्का बसला आहे. हिमाचलमधील जयराम सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या रामलाल मारकंडा यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधूनभाजपामध्ये दाखल झालेले रवी ठाकूर यांना पोटनिवडणुकीत उमेदवार बनवल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला आहे. रामलाल मारकंडा यांनी म्हटलं आहे की, ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात. 

2017 मध्ये रामलाल मारकंडा हे लाहौलमधून आमदार होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवी ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. आता पोटनिवडणुकीत रवी ठाकूर हे भाजपाचे उमेदवार आहेत. रामलाल मारकंडा यांनी एनएसयूआयमधूनच राजकारणाला सुरुवात केली होती.

काँग्रेसचे बंडखोर नेते रवी ठाकूर यांना लाहौल-स्पीतीमधून भाजपाचे तिकीट मिळाल्याने हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. याच दरम्यान, माजी मंत्री रामलाल मारकंडा मंगळवारी लाहौल येथे पोहोचले आणि त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देण्याची घोषणा केली. मी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे मारकंडा यांनी जाहीर केलं.

हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या एकूण 4 जागा आहेत. राज्यातील चारही जागांवर एकाच टप्प्यात एक जून रोजी निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार असून, त्यापैकी सातव्या टप्प्यातील मतदानासाठी हिमाचल प्रदेशची निवड करण्यात आली आहे. कांगडा, हमीरपूर, शिमला आणि मंडी या हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या जागा आहेत. देशभरातील लोकसभेच्या सर्व जागांसाठीचे निवडणूक निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक