रामलाल यांनी भाजपाचे संघटना महासचिवपद सोडले, व्ही. सतीश यांच्याकडे जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 21:39 IST2019-07-13T21:39:03+5:302019-07-13T21:39:22+5:30
भारतीय जनता पक्षाचे संघटन महासचिव रामलाल यांनी पक्षातील पद सोडले असून, ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार असल्याची माहिता सूत्रांनी दिली आहे.

रामलाल यांनी भाजपाचे संघटना महासचिवपद सोडले, व्ही. सतीश यांच्याकडे जबाबदारी
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे संघटन महासचिव रामलाल यांनी पक्षातील पद सोडले असून, ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार असल्याची माहिता सूत्रांनी दिली आहे. रामलाल यांच्याकडे 2006 मध्ये भाजपाचे संघटना महासचिवपद सोपवण्यात आले होते. आता संघटना महासचिव म्हणून व्ही. सतीश हे काम पाहतील.
2005 मध्ये भाजपाचे तत्कालीन संघटना महासचिव संजय जोशी यांची कथित सेक्स सीडी प्रसारित झाल्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 2006 मध्ये भाजपाच्या संघटना महासचिवपदाची जबाबदारी रामलाल यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
भाजपामध्ये संघटना महामंत्री आणि संघटना मंत्री हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून पाठवले जातात. या पदावरील व्यक्ती भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम करतात. भाजपामध्ये पक्षाध्यक्षपदानंतर संघटना महासचिव हे पद मोठे मानले जाते.