रामदास आठवलेंची 'गलती से मिस्टेक'; अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वेगळ्याच 'अमित'ला केलं टॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 05:53 PM2021-10-22T17:53:55+5:302021-10-22T18:05:48+5:30

Ramdas Athawale And Amit Shah : रामदास आठवले यांनी देखील अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण शुभेच्या देताना मात्र त्यांच्याकडून एक चूक झाली आहे. 

Ramdas Athawale wishes Amit Shah on birthday but made mistake and Tagged another Amit | रामदास आठवलेंची 'गलती से मिस्टेक'; अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वेगळ्याच 'अमित'ला केलं टॅग

रामदास आठवलेंची 'गलती से मिस्टेक'; अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वेगळ्याच 'अमित'ला केलं टॅग

Next

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने देशातील दिग्गज नेते आणि भाजपाचे अनेक मोठे नेते अमित शाह यांना सदिच्छा देत आहेत. शहा यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण शुभेच्छा देताना मात्र त्यांच्याकडून एक चूक झाली आहे. 

रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासारख्या ऊर्जावान आणि ओजस्वी गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा मजबूत झाली आहे. तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो" असं म्हणत आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहे. पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी वेगळ्याच एका 'अमित'ला टॅग केलं आहे. अमित शाह यांच्या ऐवजी अमित जोटवानी या व्यक्तीला टॅग केलं आहे. सध्या सोशल मीडियावर रामदास आठवलेंच्या या 'गलती से मिस्टेक' ची जोरदार चर्चा रंगली आहे. 


 

Web Title: Ramdas Athawale wishes Amit Shah on birthday but made mistake and Tagged another Amit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app