हैदराबाद : देशाच्या आर्थिक परिस्थितीची घडी नीट बसविणो हे नरेंद्र मोदी सरकारसमोरील मोठे काम असले, तरी राम जन्मभूमीचा प्रश्न भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेवर अजूनही आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
होईल तेवढय़ा लवकर आम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत; परंतु पहिले प्राधान्य हे उत्तम प्रशासन देऊन देशाला विकासाच्या मार्गावर पुन्हा आणणो आहे. हे प्रश्न आज सरकारपुढे महत्त्वाचे आहेत, असे राव म्हणाले. राम जन्मभूमी किंवा समान नागरी कायदा किंवा कलम 37क् असे विषय भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहेत.
सगळेच विषय ताबडतोब सोडविता येत नसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना स्वातंत्र्य नसल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. (वृत्तसंस्था)
च्आम्ही राममंदिर बांधायला निघालेलो नाहीत. जे लोक हे मंदिर बांधू इच्छितात त्यांच्या मार्गातील अडथळे सरकार दूर करील, असे राव म्हणाले. विचारसरणीच्या दृष्टीने राम जन्मभूमीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने अमलात आणताना सरकार त्यांचा तोच क्रम ठेवील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}