शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राम आमचे आराध्यदैवत, तर भाजपासाठी केवळ मतदैवत, सपा नेत्याची घणाघाती टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 18:24 IST

भगवान श्रीराम हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. मात्र भाजपासाठी श्रीराम हे केवळ मतदैवत आहेत, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते...

लखनौ - भगवान श्रीराम हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. मात्र भाजपासाठी श्रीराम हे केवळ मतदैवत आहेत, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रामगोविंद चौधरी यांनी केली आहे. यावेळी चौधरी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. अमित शहा कुणी मास्टरमाइंड नाही तर प्रसारमाध्यमांनी त्यांना मास्टर माइंड बनवले आहे. अमित शहांना जे हवे असते तशाच बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये छापल्या आणि दाखवल्या जातात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चौधरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांनी हिंदूंचा धार्मिक रंग असलेल्या भगव्या रंगाला आपल्या आचरणाने बदनाम केले आहे. आपल्या असत्य आचरणातून लोकांना फसवून आणि खोटे बोलून भगव्याला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत, असे चौधरी म्हणाले.   केवळ भाजपा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करून न थांबता रामगोविंद चौधरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले. ते पुढे म्हणाले, "भाजपा आणि आरएसएसच्या प्रचाराची पद्धत ही हिटलरसारखी आहे. कैराना आणि नूरपूरच्या निवडणुकीमध्ये दंगा करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र तेथील मतदारांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला." तसेच राम मंदिर खटल्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल, सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या दाव्याचा आधार घेत भाजपा आता न्यायालयाच्या निकालांनाही प्रभावित करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliticsराजकारण