शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Ayodhya : राम मंदिरासाठी जमीन खरेदी वादात; AAP खासदार म्हणाले, '20 लाखांची जमीन अडीच कोटींमध्ये विकत घेतली'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 8:50 AM

Ram Mandir Trust Land Purchase : भाजपावर निशाणा साधत खासदार संजय सिंह म्हणाले की, देशभरातील कोट्यवधी गरीब, सामान्य लोक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि कामगार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देत आहेत, परंतु भाजपा नेते देणगीचे पैसे चोरुन भ्रष्टाचार करत आहेत.

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्येराम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) खरेदी केलेल्या जमिनीतील घोटाळ्यासंदर्भात एकामागून एक नवीन खुलासे करण्यात येत आहेत. यावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेससह आम आदमी पार्टी राम मंदिर ट्रस्टच्या आरोपी विश्वस्तांसह भाजपा नेत्यांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा राम मंदिरासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या जमीन घोटाळ्यासंदर्भातील इतर पुरावे सादर केले आहेत. तसेच,अयोध्यामधील भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकांवर स्वस्त दराने जमीन खरेदी केल्याचा आणि राम मंदिर ट्रस्टला अनेक पटींनी विकल्याचा केल्याचा आरोप केला आहे.

राजधानी लखनौमध्ये संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अयोध्येत भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय यांचे पुतणे दीप नारायण यांच्याकडून 20 फेब्रुवारी 2021 रोजी अवघ्या 20 लाख रुपयात खरेदी केली होती. मग ती राम मंदिर ट्रस्टला 11 मे 2021 रोजी अडीच कोटींमध्ये विकली. त्याचप्रमाणे अयोध्याच्या कोट रामचंदरमधील जगदीश प्रसाद यांना 14.80 लाखांची जमीन महंत देवेंद्र प्रसाद यांच्याकडून 10 लाख रुपयांना मिळते. मात्र, रामजन्मभूमी ट्रस्टला 1 कोटी 60 लाखांची जमीन 4 कोटींना दिली जाते, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणात भाजपाचे महापौर आणि त्याचा पुतण्या सामील असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

चौकशीची मागणीसंजय सिंह म्हणाले, 'राम मंदिर जमीन घोटाळ्याचा आरोप असलेल्या भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय आणि विश्वस्त यांच्याशी संबंधित लोकांच्या खात्यांची चौकशी करण्याची मागणी योगी सरकारकडे आम आदमी पार्टीने केली आहे. ज्यामुळे देणगी चोरीचा संपूर्ण खेळ उघडकीस येईल.' तसेच, फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून राम मंदिराच्या नावावर जमीन खरेदी घोटाळ्यासंदर्भातील सुनावणी करून आरोपींना त्वरित तुरूंगात पाठवावे, असेही संजय सिंह यांनी सांगितले.

भाजपावर निशाणाभाजपावर निशाणा साधत खासदार संजय सिंह म्हणाले की, देशभरातील कोट्यवधी गरीब, सामान्य लोक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि कामगार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देत आहेत, परंतु भाजपा नेते देणगीचे पैसे चोरुन भ्रष्टाचार करत आहेत. यामुळे अयोध्येत राम मंदिर बांधण्यास विलंब होत आहे. राम मंदिराच्या नावावर 2 कोटींची जमीन 18.5 कोटींमध्ये विकली गेल्याच्या खुलाशाच्या 6 दिवसानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे सरकार या देणगी चोरांना वाचवू इच्छित असल्याचे सिद्ध होते. ज्यावेळी भाजपा नेते देणगी चोरीमध्ये सामील होतात, मग सरकार त्यांच्याविरोधात कारवाई तरी कशी करू शकेल?, असा सवाल संजय सिंह यांनी केला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या