शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

अयोध्येतील राम मंदिरांने सरकारचा खजिना भरला, अब्जावधीचा कर दिला, आकडा वाचून विस्फारतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:02 IST

Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत २ हजार १५० कोटी रुपये एवढी रक्कम खर्च झाली आहे. तसेच यादरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जीएसटीसह विविध करांच्या माध्यमातून सरकारला सुमारे ४०० कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्येतील राम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या रामललांच्या मंदिरामध्ये गतवर्षी प्राणप्रतिष्ठापना झाली होती. तेव्हापासून या मंदिरामध्ये भाविकांचा ओघ सुरू आहे. दरम्यान, या राम मंदिराचं जवळपास ९६ टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच जून महिन्यापर्यंत मंदिराचं संपूर्ण काम पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत २ हजार १५० कोटी रुपये एवढी रक्कम खर्च झाली आहे. तसेच यादरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जीएसटीसह विविध करांच्या माध्यमातून सरकारला सुमारे ४०० कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट  मणिराम छावणीमध्ये झालेल्या बैठकीनंतर ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक रविवारी अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ७ विश्वस्त आणि ४ विशेष निमंत्रित सदस्य उपस्थित होते. तर २ विश्वस्त अनुपस्थित होते. या बैठकीवेळी हल्लीच निधन झालेले विश्वस्त  कामेश्वर चौपाल आणि मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या बैठकीमध्ये मंदिरावर झालेला खर्च आणि मंदिराच्या बांधकामातील प्रगतीबाबत विश्वस्तांनी चर्चा केली. महामंत्री चंपत राय यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारी २०२० रोजी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मागच्या ५ वर्षांत ट्रस्टच्या खात्यांमधून सरकारच्या विविध विभागांना ३९६ कोटी रुपयांचा कर दिला गेला आहे. त्यामध्ये जीएसटी २७२ कोटी, टीडीएस ३९ कोटी, लेबर सेस १४ कोटी, इएसआय ७.४ कोटी, विमा ४ कोटी, जन्मभूमीच्या नकाशासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाला ५ कोटी, अयोध्येमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी मुद्रांक शुल्क म्हणून २९ कोटी, वीजबिलापोटी १० कोटी, तसेच  रॉयल्टी म्हणून १४.९ कोटी रुपये सरकारला दिले. यामध्ये मंदिरासाठी आणलेल्या दगडांच्या रॉयल्टीसाठी राजस्थान सरकार, कर्नाटक सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला ही रक्कम देण्यात आली आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTaxकरUttar Pradeshउत्तर प्रदेश