Ram Mandir Ayodhya: राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवलं जाणार नाही; दोन दिवसांत ट्रस्टचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 02:24 PM2020-07-28T14:24:14+5:302020-07-28T14:26:47+5:30

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव म्हणतात; राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवणार ही तर अफवा

Ram Mandir Ayodhya no time capsule will be kept under tample Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust clarifies | Ram Mandir Ayodhya: राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवलं जाणार नाही; दोन दिवसांत ट्रस्टचा यू-टर्न

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवलं जाणार नाही; दोन दिवसांत ट्रस्टचा यू-टर्न

Next

अयोध्या: पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जाऊन राम मंदिरासाठी भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. राम मंदिराच्या २ हजार फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवली जाणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधल्या एका सदस्यानं दोन दिवसांपूर्वी दिली होती. मात्र टाईम कॅप्सूलबद्दलची माहिती खोटी असल्याचं ट्रस्टच्या सचिवांनी सांगितलं आहे. 

राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सुल ठेवण्यात येईल, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याला त्या कॅप्सुलची मदत होईल. त्याला राम जन्मभूमीबद्दलचा महत्त्वपूर्ण तपशील त्यातून मिळेल, अशी माहिती चौपाल यांनी रविवारी (२६ जुलै) दिली होती.



यानंतर आता दोनच दिवसांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी खुलासा केला आहे. ५ ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन करताना जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण राय यांनी दिलं. सचिव आणि सदस्य यांनी परस्परविरोधी माहिती दिल्यानं ट्रस्टमध्ये एकमत नाही का, त्यांच्यातच मतभेद आहेत का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.


अयोध्येत जय्यत तयारी 
अयोध्येतील राम जन्मभूमीबद्दल ९ महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं ९ नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल दिला. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येला भेट देतील. मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल. या सोहळ्यासाठी असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं मोठी तयारी सुरू केली आहे. ४० किलो वजनाची चांदीची वीट ठेवून भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टनं दिली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'

...म्हणून अयोध्येतलं राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार; 'त्या' दोन वस्तूंशिवाय उभं राहणार

Web Title: Ram Mandir Ayodhya no time capsule will be kept under tample Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.