Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:56 PM2020-07-26T22:56:01+5:302020-07-26T22:56:40+5:30

५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन

Ayodhya Ram Mandir Time capsule to be placed 2000 feet under temple | Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'

googlenewsNext

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir  in Ayodhya) उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भूमिपूजन करतील. त्यानंतर मंदिराची उभारणी सुरू होईल. अयोध्येत उभारण्यात येणारं राम मंदिर अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. या मंदिराचं बांधकाम केलं जात असताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधल्या एका सदस्यानं दिली आहे. 

राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सुल ठेवण्यात येईल, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याला त्या कॅप्सुलची मदत होईल. त्याला राम जन्मभूमीबद्दलचा महत्त्वपूर्ण तपशील त्यातून मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.



अयोध्येतील राम जन्मभूमीबद्दल ९ महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं ९ नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल दिला. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येला भेट देतील. मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल. या सोहळ्यासाठी असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं मोठी तयारी सुरू केली आहे. ४० किलो वजनाची चांदीची वीट ठेवून भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टनं दिली आहे.

Read in English

Web Title: Ayodhya Ram Mandir Time capsule to be placed 2000 feet under temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.