शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: March 24, 2015 23:38 IST

सोलापूर : ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात दि. 25 मार्च रोजी सोलापूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर : ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात दि. 25 मार्च रोजी सोलापूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. 15 मार्च 2015 रोजी पश्चिम बंगालमध्ये 71 वर्षीय नन्सवर दुष्कर्म करण्यात आले. दि. 17 मार्च 2015 रोजी हरियाणा येथील चर्चवर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. दिल्ली येथील चर्चवर हल्ले व जाळपोळ करण्यात आली. न्यू मुंबई पनवेल चर्चवर दगडफेक केली. सोलापूर जिल्?ातही धर्मगुरूंना मारहाण व चर्चवर हल्ला करण्यात आला. याबाबत दि. 28 डिसेंबर 2014 रोजी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कृत्यांचा निषेध करण्यासाठी आणि अन्याय-अत्याचार थांबवून संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मसिहा चौक, मोदी येथून निषेध मूक मोर्चा काढण्यात येणार आहे तरी समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी केले. पत्रकार परिषदेस रेव्हरंड इमान्युवेल म्हेत्रे, मोहन शाहीर, सोलापूर ख्रिश्चन समाज शहर जिल्हाध्यक्ष जॉन फुलारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)