दीडशे वारांगणांकडून बांधली राखी
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30
आर्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम

दीडशे वारांगणांकडून बांधली राखी
आ ्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम अहमदनगर: ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी दीडशे वारांगणांकडून राखी बांधून घेत त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. रक्षाबंधनाच्या दिवशी आलेल्या भावांना पाहून या वारांगणा भगिनी हरखून गेल्या.स्नेहालयाच्या प्रांगणामध्ये शनिवारी हा रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम झाला. यावेळी ऑर्ट ऑफ लिव्हिंगचे अमर कळमकर, पंकज कडू, माधव गवई, तुषार केदार, योगेश काकडे, गणेश क्षीरसागर, भरत गडदे, गणेश ठोंबरे, प्रमोद डुक्रे आदी साधक उपस्थित होते. गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच हातात राखी घेतली आहे. भाऊ म्हणून येणारे आमच्या जीवनात दुर्मिळ आहेत. रक्षाबंधन असते, हे माहितीच नव्हते. माणूस म्हणून कोणीतरी पाहिले, याचाच मोठा आनंद आहे, अशा भावना अनेक वारांगणांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी ॲड. श्याम आसावा, दीपक बुरम, अंबादास चव्हाण, प्रवीण मुत्याल, बाबासाहेब सांगळे यांनी परिश्रम घेतले.