राकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का? -काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 04:16 IST2018-10-24T04:15:42+5:302018-10-24T04:16:27+5:30
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि रॉच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून, राकेश अस्थाना प्रकरणी घेऊन चर्चा केली

राकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का? -काँग्रेसचा सवाल
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि रॉच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून, राकेश अस्थाना प्रकरणी घेऊन चर्चा केली असून, मोदींना या प्रकरणात एवढी गोडी निर्माण का झाली, असा सवाल काँग्रेसने मंगळवारी विचारला. मोदी हे राकेश अस्थाना यांच्या सुरू असलेल्या चौकशीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा काँग्रेसचा आरोप आहे. मोदी यांच्या सूचनेवरूनच अस्थाना यांना सीबीआयमध्ये आणण्यात आले होते व प्रत्येक संवेदनशील प्रकरणात त्यांची दखल सुनिश्चित केली गेली होती, असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.
>चांगल्या अधिकाऱ्यांना केले दूर?
नीना सिंह (संयुक्त संचालक, गुन्हे), अनीस प्रसाद (डीआयजी), के. गोपालकृष्णन राव (पोलीस अधीक्षक) हे सीबीआयमध्ये असताना नीरव मोदी आणि मेहुल चोकसी व रायन पब्लिक स्कूलसह सगळ््या संवेदनशील प्रकरणांची चौकशी करीत होते. या अधिकाºयांना घाईघाईने सीबीआयमधून दूर करून आपल्या आवडीच्या परंतु जे गोध्रा जळीत प्रकरणी संशयाच्या भोवºयात होते त्यांना सीबीआयमध्ये जागा दिली. पंतप्रधान मोदी आज त्यांनाच वाचवण्यासाठी सगळे ते प्रयत्न करीत आहेत. एवढेच काय त्यांनी केंद्रीय दक्षता आयोगालाही (सीव्हीसी) सोडलेले नाही, असे सूरजेवाला यांनी म्हटले.