शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:27 IST

देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली  - देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.भाजपचे अशोक वाजपेयी म्हणाले की, नीती आयोगाने त्याच्या अहवालात पुढील वर्षी देशाच्या काही भागांत पाणीटंचाई असेल, असे म्हटले आहे. भाजपचे सरोज पांडे यांनी जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, लक्षवेधी सूचना दिली गेल्यास या विषयावर मी चर्चेला परवानगी देईन.सदस्यांनी आपापसांत चर्चा करून अशी नोटीस देण्याचा सल्लाही नायडू यांनी दिला. काँग्रेसचे टी. सुब्बरामी रेड्डी यांनी वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करून येत्या काही वर्षांत भारत लोकसंख्येत चीनलाही मागे टाकेल, असे म्हटले. कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन आणि काही सवलती काढून घेण्याची उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वाढत्या लोकसंख्येने पर्यावरण, आर्थिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून, बेरोजगारी वाढत चालली आहे. प्रोत्साहन आणि सवलती काढून घेतल्याशिवाय लोकसंख्या नियंत्रण होणार नसल्याचे रेड्डी म्हणाले.नद्या जोडण्याची मागणीशून्य कालावधीत हा मुद्दा भाजपचे सत्यनारायण जतिया यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकच्या काही भागांनी परंपरागतरीत्या पाणीटंचाईला तोंड दिले आहे; पण ही टंचाई आता नव्या भागांतही पोहोचली आहे.पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, असे सांगून जतिया यांनी पाच मोठ्या नद्या एकमेकींशी जोडण्याचा प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याची गरज व्यक्त केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळIndiaभारत