शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election Results: राजस्थानमधून दोन जागा जिंकत काँग्रेसची भाजपवर सरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:53 IST

ज्योतिरादित्य, दिग्विजयसिंह, शिबू सोरेन राज्यसभेवर

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत काँग्रेसनेराजस्थानात भाजपवर मात करीत दोन जागा जिंकल्या. तथापि, भाजपने मध्यप्रदेशातून राज्यसभेची एक अतिरिक्त जागा जिंकून काँग्रेसला हादरा दिला. राजस्थानमधून काँग्रेसचे के. वेणुगोपाल आणि नीरज डांगी राज्यसभेवर निवडून आले आहेत. मध्यप्रदेशातून भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे, सुमेरसिंह सोळंकी आणि काँग्रेसचे दिग्विजयसिंह विजयी झाले आहेत.काँग्रेसने तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने गुजरातमधील मतमोजणी लांबणीवर पडली. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरुद्ध आपले आमदार पळवत असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले आमदार विविध हॉटेलमध्ये ठेवले होते; परंतु अखेर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या रणनीतीमुळे काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, झारखंड, तसेच मणिपूर, मिझोराम आणि मेघालयसह आठ राज्यांतील राज्यसभेच्या १९ जागांसाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या जागांसाठी २६ मार्च रोजीच निवडणूक घेण्यात येणार होती; परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.मणिपूरमध्ये विपरीत राजकीय स्थिती असताना भाजपचे लेईसेम्बा सनजाओबा हे विजयी झाले. दुसरीकडे, काँग्रेसला आपले उमेदवार टी. मंगी बाबू यांचा विजय निश्चित करण्यासाठी अन्य पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळविण्यात यश येऊनही त्यांना विजय मिळाला नाही. यावरून मणिपूरमधील बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार सुरक्षित असल्याचे संकेत मिळतात.झारखंडमधून झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन आणि भाजपचे दीपक प्रकाश निवडून आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला मात्र पराभव पत्करावा लागला. झारखंड सरकारमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा भागीदार आहे.मेघालयात एनपीपीचे उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट होते व विरोधी काँग्रेसचा उमेदवार जिंकण्याची कोणतीही शक्यता नव्हती. मिझोराममध्ये एमएनएफचा उमेदवार सहजपणे निवडून आला. एमएनएफची राज्यात सत्ता आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशमध्ये राज्यसभेच्या चारही जागा जिंकल्या. त्या त्यांच्याकडे तेवढी संख्या होती म्हणूनच.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशGujaratगुजरात