शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 15:46 IST

Rajya Sabha Election Result 2022: गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नगालँडच्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवल्यानंतर, भाजपने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा गाठला होता.

या वर्षाच्या एप्रिल महिन्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये, म्हणजेच राज्यसभेत भारतीय जनता पक्षाची (BJP) सदस्य संख्या 100 वर पोहोचली होती. मात्र, राज्यसभेच्या 57 जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीनंतर, ती कमी झाली आहे. राज्यसभेतील भाजपची सदस्य संख्या आता 95 वरून 91 वर आली आहे.

100 पर्यंत पोहोचण्यासाठी पाहावी लागेल वाट -राज्यसभेच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, निवृत्त होत असलेल्या 57 सदस्यांसह राज्यसभेच्या एकूण 232 सदस्यांमध्ये भाजपचे 95 सदस्य आहेत. निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये भाजपच्या एकूण 26 सदस्यांचा समावेश आहे. तर या निवडणुकीत भाजपचे 22 सदस्य निवडून आले आहेत. अशा प्रकारे भाजपला एकूण 4 जागांचे नुकसान झाले आहे. नुवडून आलेल्या सदस्यांच्या शपथविधीनंतर, भाजपच्या एकूण सदस्यांची संख्या 95 वरून 91 वर येईल. म्हणजेच पुन्हा एकदा 100 च्या जवळपास पोहोचण्यासाठी अथवा शंभरचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी वाट पाहावी लागणार आहे.

अद्यापही 13 जागा रिक्त - राज्यसभेतील सात नामनिर्देशित सदस्यांसह एकूण 13 जागा अद्यापही रिक्त आहेत. नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीनंतर आणि रिक्त जागा भरल्यानंतर, भाजपची सदस्य संख्या 100 च्या जवळपास पोहोचू शकते. कारण, काही अपवाद वगळता, नामनिर्देशित सदस्य सर्वसाधारणपणे त्यांच्या नामांकनानंतर सहा महिन्यांच्या आत स्वतःला एखाद्या पक्षाशी (शक्यतो सत्ताधारी पक्ष) जोडून घेतात.

एप्रिल महिन्यात गाठला होता 100 चा आकडा -गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नगालँडच्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवल्यानंतर, भाजपने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा गाठला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही भाजपची मोठी अचिव्हमेंट असल्याचे म्हटले होते.

राज्यसभेच्या 57 जागांसाठी झाले मतदान - राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर, मागच्या शुक्रवारी उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमधील सर्वचे सर्व 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यात भाजपच्या 14 उमेदवारांचा समावेश होता. 

या ठिकाणीही चांगली कामगिरी - हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 16 जागांसाठी कालच्या शुक्रवारी निवडणूक झाली. येथे भाजपला महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी तीन-तीन जागांवर तर हरियाणा आणि राजस्थानात प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. अशा प्रकारे भाजपने एकूण 57 जागांपैकी 22 जागा जिंकल्या आहेत. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाElectionनिवडणूकParliamentसंसद