'मी हवनात आहुती देईन पण...' मिमिक्री प्रकरणावर उपराष्ट्रपती भडकले, काँग्रेस नेत्यांना स्पष्टच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 04:02 PM2023-12-20T16:02:23+5:302023-12-20T16:03:34+5:30

महत्वाचे म्हणजे, संसदेच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला घेरणारा काँग्रेस पक्ष, या मिमिक्री प्रकरणामुळे स्वतःच अडचणीत आला आहे अथवा घेरला गेला आहे.

rajya sabha chairman jagdeep dhankhar reacts inrajya sabha over mimicry row | 'मी हवनात आहुती देईन पण...' मिमिक्री प्रकरणावर उपराष्ट्रपती भडकले, काँग्रेस नेत्यांना स्पष्टच सुनावले

'मी हवनात आहुती देईन पण...' मिमिक्री प्रकरणावर उपराष्ट्रपती भडकले, काँग्रेस नेत्यांना स्पष्टच सुनावले


टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीवरून राज्यसभा सभापती जगदीप धनखड जबरदस्त भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी स्पष्ट शब्दात आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर, खासदार कल्याण बॅनर्जी संसद परिसरात धनखड यांची मिमिक्री करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हसत-हसत व्हिडिओ तयार करत होते. 

महत्वाचे म्हणजे, संसदेच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला घेरणारा काँग्रेस पक्ष, या मिमिक्री प्रकरणामुळे स्वतःच अडचणीत आला आहे अथवा घेरला गेला आहे. यानंतर आता, उपराष्ट्रपती धनखड यांनी यामुद्द्यावरून राहुल गांधी यांना लक्ष करत जबरदस्त सुनावले आहे.

मिमिक्रीसंदर्भात काय म्हणाले सभापती -
या मिमिक्री प्रकरणानंतर, राज्यसभेच्या कार्यवाहीदरम्यान  सभापती जगदीप धनखड अत्यंत दुःखी झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवरही निशाणा साधला. धनखड काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना म्हणाले, 'आपण अनुभवी नेते, आपण म्हणता 138 वर्षांपूर्वीचा पक्ष आहे. काय झाले? आपल्याला सर्व माहीत आहे. आपली चिप्पी माझ्या कानात घुमत आहे. ते नेते विरोधक आणि काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काय सुरू आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्याला समजायला हवे, एखादी व्यक्ती व्हिडिओग्राफी करून आनंद घेते आणि अँप्लीफाय करते, हे संस्कार आहेत का? पातळी इथपर्यंत आली आहे का?'

...तर मी आहुती देईन -
जगदीप धनखर एवढ्यावरच थांबले नाही, तर आपली मांडतांना ते म्हणाले, “दिग्विजय सिंहजी, माझं ऐकूण घ्या. आपण जगदीप धनखर यांचा कितीही अपमान केलात तरी मला चिंता नाही. मात्र, भारताच्या उपराष्ट्रपतींची, शेतकरी समाजाची, माझ्या वर्गाची... हवनात सर्वस्व अर्पण करून टाकीन.

मला माझी पर्वा नाही. कुणी माझा अपमान केला, तर मी सहन करतो. मी रक्ताचा गोट पितो. पण मी माझ्या पदाची प्रतिष्ठा राखू शकलो नाही, हे मी कदापी सहन करणार नाही. सभागृह आणि या पदाच्या गरिमा राखणे हे माझे काम आहे. आपण अंदाजही लावू शकत नाही, काय घडले आहे?'

 

Web Title: rajya sabha chairman jagdeep dhankhar reacts inrajya sabha over mimicry row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.