राजीव त्यागींच्या मृत्यूने चॅनलच्या चर्चांवर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 02:31 IST2020-08-14T02:30:42+5:302020-08-14T02:31:20+5:30

राजीव त्यागी यांच्या मृत्यूसाठी टीव्ही चॅनललाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

Rajiv Tyagis death calls into question the channel's discussions | राजीव त्यागींच्या मृत्यूने चॅनलच्या चर्चांवर सवाल

राजीव त्यागींच्या मृत्यूने चॅनलच्या चर्चांवर सवाल

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचा टीव्हीवर लाइव्ह चर्चा सुरु असताना प्रकृती बिघडल्यानंतर मृत्यू झाला. तथापि, टीव्ही चॅनलवर होणाऱ्या या चर्चांबाबत काँग्रेसने गंभीर सवाल उपस्थित करत सोशल मीडियावर नवी चर्चा सुरु केली आहे. राजीव त्यागी यांच्या मृत्यूसाठी टीव्ही चॅनललाच आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे.

प्रशांत भूषण यांनी सवाल केला आहे की, चॅनल कुठपर्यंत जीव घेत राहणार आहेत? राजीव त्यागी यांच्या मृत्यूस संबित पात्रा आणि चॅनलचे अँकर जबाबदार असल्याचा आरोपही केला.

कोण काय म्हणाले?
काँग्रेसच्या प्रवक्त्यांनीही सकाळपासून चॅनलवरील चर्चेबाबत सवाल उपस्थित केले.
मोहन प्रकाश यांचा आरोप होता की, चॅनल आणि अँकर असे विषय चर्चेसाठी निवडतात ज्यातून वैमनस्य निर्माण होते. च्अशावेळी अनुचित भाषा वापरुन अपमानितही केले जाते. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, चर्चेतून टीआरपीचा व्यवसाय करणारे चॅनेल कधीपर्यंत हे प्रकार सुरु ठेवणार आहेत.

Web Title: Rajiv Tyagis death calls into question the channel's discussions