शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रजनीकांत, कमल हसन यशस्वी राजकारणी बनतील असे वाटत नाही - मणीशंकर अय्यर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 5:46 PM

राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील असे वाटत नाही.

ठळक मुद्देरजनीकांत एक चांगला माणूस आहे अशा चांगल्या माणसांची आज राजकारणात आवश्यकता आहे. दक्षिणेतील यशस्वी अभिनेते शिवाजी गणेशन, कॅप्टन विजयकांथ राजकारणात कसे अपयशी ठरले त्याची त्यांनी उदहारणे दिली.

नवी दिल्ली - राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील  असे वाटत नाही असे मत काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या मणी शंकर अय्यर यांनी व्यक्त केले. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. रजनीकांत यांच्या राजकारणात उतरण्याचे सर्वांनीच स्वागत केले आहे. 

रजनीकांत एक चांगला माणूस आहे अशा चांगल्या माणसांची आज राजकारणात आवश्यकता आहे. पण चांगली माणस देशाची पंतप्रधान होतील अशी अपेक्षा करण म्हणजे मणीशंकर अय्यरने देशाच्या पंतप्रधानपदाच स्वप्न पाहण्यासारख आहे. असं घडू शकत नाही असे अय्यर म्हणाले. एमजीआर आणि जयललिता द्रविडीयन चळवळीशी संबंधित होते. त्यांनी त्यांच्या सिनेक्षेत्राच्या प्रभावाचा राजकारणात पुरेपूर वापर केला त्यामुळे ते राजकारणात यशस्वी ठरले असे अय्यर म्हणाले. 

दक्षिणेतील यशस्वी अभिनेते शिवाजी गणेशन, कॅप्टन विजयकांथ राजकारणात कसे अपयशी ठरले त्याची त्यांनी उदहारणे दिली. सिनेमामध्ये त्यांची कारकीर्द यशस्वी होती पण तेच यश त्यांना राजकारणात लाभले नाही. रजनीकांत तामिळनाडूमध्ये काँग्रेसला हरवतील पण अन्य पक्षांना पराभूत करणे त्यांना जमणार नाही असे मणीशंकर अय्यर म्हणाले.  

गुजरात निवडणुकीच्यावेळी मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नीच माणूस म्हटले होते. मोदी नीच आणि असभ्य माणूस आहे अशी विधाने त्यांनी केली होती. गुजरात निवडणुकीत त्यांच्या या विधानाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने लगेचच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं.                           

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरKamal Hassanकमल हासन