शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

प्रख्यात अभिनेते रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 6:43 AM

Rajinikanth honoured with Dadasaheb Phalke award : सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले. ‘मनिकर्णिका’ व ‘पंगा’ या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना राणावत यांना सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला.

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची यंदा मार्च महिन्यात घोषणा करण्यात आली होती. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठीचे हे पुरस्कार होते. हा पुरस्कार सोहळा गेल्या वर्षीच होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना साथीमुळे पुुढे ढकलण्यात आलेला हा सोहळा सोमवारी दिल्लीत पार पडला. हे पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आले.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रियदर्शन यांच्या ‘मरक्कर : लायन ऑफ दी अरेबियन सी’ या मल्याळी चित्रपटाला देण्यात आला. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘दी ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादासाठीचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची भूमिका असलेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटाने मिळविला आहे.

पल्लवी जोशी, सावनी रवींद्र यांचाही सन्मान‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सावनी रवींद्र हिला पुरस्कार मिळाला. ‘दी ताश्कंद फाइल्स’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना पुरस्कार मिळाला. ‘आनंदी गोपाळ’ला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. विशेष उल्लेखनीयमध्ये ‘लता भगवान करे’, ‘पिकासो’ सह आणखी काही चित्रपटांना पुरस्काराने गौरविले गेले.

टॅग्स :rajinikanthरजनीकांतKangana Ranautकंगना राणौतManoj Bajpayeeमनोज वाजपेयी