शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

भाजपा मला रसद पुरवत असल्याची चर्चा खोटी- रजनीकांत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 8:48 PM

रजनीकांत यांनी पेरियार यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांनाही फटकारले.

चेन्नई: भाजपा मला रसद पुरवत असल्याची चर्चा अनेकदा केली जाते. परंतु, माझ्या पाठिशी भाजपा नव्हे तर देव आणि जनता आहे. तुम्ही मला कितीही वेळा हा प्रश्न विचारला तरी माझे उत्तर एकच असेल, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी स्पष्ट केले.  ते मंगळवारी चेन्नईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) राज्यात काढण्यात येणाऱ्या रामराज्य रथ यात्रेसंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, तामिळनाडू हे एक निधर्मी राज्य आहे. याठिकाणची शांतता भंग होईल, अशी कोणतीही गोष्ट रोखणे आपले कर्तव्य आहे. मला आशा आहे की, पोलीस आणि प्रशासन राज्यातील धार्मिक एकोपा जपण्यासाठी योग्य ती पावले उचलतील, असे रजनीकांत यांनी सांगितले. तसेच रजनीकांत यांनी पेरियार यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांनाही फटकारले. मी या घटनेचा निषेध करतो. हे दुसरे-तिसरे काहीही नसून शुद्ध रानटीपणा आहे. हे घडायला नको होते, असेही रजनीकांत यांनी सांगितले. रजनीकांत हे हिमालयात धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. परंतु, ते राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले नव्हते. याबाबत विचारले असता, त्यांनी म्हटले की, मी स्वत:ला राजकारणात पूर्णपणे गुंतवून घेतल्याशिवाय दैनंदिन घडामोडींवर भाष्य करू शकत नाही. मला आणखी कितीवेळा ही गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल, ते माहिती नाही, असे रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांना सुनावले.

टॅग्स :rajinikanthरजनीकांतBJPभाजपा