शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

सी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:17 AM

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’ने गेल्या नोव्हेंबरमध्ये नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमांनुसार घेतलेल्या सी. ए. फायनल परीक्षांमध्ये संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा मान सिद्धांत भंडारी व शादाब हुसैन या राजस्थानच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला.

नवी दिल्ली: ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’ने गेल्या नोव्हेंबरमध्ये नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमांनुसार घेतलेल्या सी. ए. फायनल परीक्षांमध्ये संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा मान सिद्धांत भंडारी व शादाब हुसैन या राजस्थानच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला. सिद्धांत जोधपूरचा असून त्याने ८०० पैकी ५५५ (६९.३८ टक्के) गुण मिळविले. शादाब हुसैन हा कोटा येथील एका२२ शिंप्याचा मुलगा असून त्याला ८०० पैकी ५९७ (७४.६३ टक्के) गुण मिळाले. दोघांनीही दोन्ही गटांतील सर्व आठही विषयांची परीक्षा एकदम देऊन पहिल्याच प्रयत्नांत हे धवल यश संपादित केले.नव्या अभ्यासक्रमात कोडे, गुजरात येथील शाहीद हुसैन शोकत मेमन (७३ टक्के) व पुरूलिया, प. बंगाल येथील ऋषभ शर्मा (७१.८८ टक्के) गुणवत्ता यादीत देशात अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. जुन्या अभ्यासक्रमात दुसरा गुणवत्ता क्रमांक रोहित कुमार सोनी याने ६८ टक्के गुणांसह मिळविला.तिसरा गुणवत्ता क्रमांक अहमदाबाद, गुजरात येथील पुलकित अरोरा व कोलकाता, प. बंगाल येथील जय बोहरा यांना प्रत्येकी ६७.६३टक्के गुणांसह मिळाला. या दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर देशात एकूण १४,९९६ नवे सी.ए. तयार झाले. नव्या अभ्यासक्रमाच्या दोन्ही गटांची स्वतंत्रपणे किंवा एकत्र परीक्षा एकूण १३,५६३ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ३,२८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ज्या १,०६० जणांनी दोन्ही गटांमध्ये उत्तीर्णता मिळविली ते सीए म्हणून अंतिमत: पात्र ठरले. जुन्या अभ्यासक्रमात एकूण ९०,८०२ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी २७,७४८ विद्याथी एका किंवा दोन्ही गटांमध्ये उत्तीर्ण झाले. ज्यांना दोन्ही गटांमध्ये उत्तीर्णता मिळाली असे १३,९०९ विद्यार्थी सी.ए. म्हणून पात्र ठरले.प्रियांशी व दिशा नागपुरात ‘टॉप’नागपूरच्या प्रियांशी जैन व दिशा बतरा (जुना अभ्यासक्रम) यांनी अखिल भारतीय पातळीवर १५ वा क्रमांक पटकावला. चिराग बतरा (नवीन अभ्यासक्रम) याने १७ वा तर राहुल आहुजा याने ४९ वा क्रमांक पटकावला.‘फाऊंडेशन’मध्ये वैष्णवी तिवारी देशात ३३ वी‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत वैष्णवी तिवारी हिने अखिल भारतीय पातळीवर ३३ वा क्रमांक मिळविला आहे. आकाश साहू याने ४२ वा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय आदर्श अग्रवाल, सम्यक मोदी, यश दलाल, राजवीरसिंह भाटिया, अमन अग्रवाल, संस्कर अग्रवाल, कौशल टिबरेवाल यांनीदेखील ‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले. वृत्त लिहिपर्यंत ‘सीपीटी’मध्ये श्रेय चांडक याने पहिले स्थान पटकाविल्याची माहिती मिळाली तर आतिशय बाकलिवाल दुसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे.>जळगावची सौम्या सीपीटीमध्ये तिसरीया दोन्ही अंतिम परीक्षांसोबतच गेल्या नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये घेतलेल्या आयपीसीसी व सीपीटी या दोन्ही परीक्षांचे निकालही जाहीर झाले. त्यापैकी सीपीटी या सीएच्या प्रवेश परीक्षेत जळगावच्या सौम्या गिरीराज जाजू या विद्यार्थिनीने ४०० पैकी ३६८ (९२ टक्के) गुणांसह संपूर्ण देशात तिसरा गुणवत्ता क्रमांक मिळविला.>आॅडिटर बनण्याची इच्छाफायनान्स क्षेत्राची आवड सुरुवातीपासूनच होती. सीएची परीक्षा देत असताना त्याचा अभ्यास सांभाळून मी शिपिंग कंपनीमधील इंटरनल आॅडिटचे कामही करत होते. देशात ४० वा क्रमांक येईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, यश मिळण्याची खात्री होती.- पूजा यादव भोर, अंबरनाथ (ठाणे)