शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

Rajasthan Politics: अशोक गहलोत गुलाम नबी आझाद यांच्या मार्गावर जाणार; सचिन पायलट यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:38 IST

Rajasthan Politics: नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे अशोक गहलोत यांचे कौतुक केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Rajasthan Politics: काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात मोठा बदल झाला. मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. पण, यानंतरही पक्षातील अंतर्गत कलह थांबायचे नाव घेत नाहीये. राजस्थानमध्ये (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात पुन्हा एकदा खटके उडण्यास सुरुवात झाली आहे.

नेमकं काय झालं?नुकतच अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे मानगढ गौरव गाथा कार्यक्रमात उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्याचवेळी पीएम मोदींनीही अशोक गेहलोत यांचे कौतुक केले होते. यावरुन आता सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी सीएम गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाले पायलट?

सचिन पायलट म्हणतात की, 'गहलोत आणि मोदी एकमेकांचे कौतुक करतात, याला अतिशय मनोरंजक घडामोड म्हणता येईल. कारण, पीएम मोदींनी गुलाम नबी आझाद यांचेही असेच कौतुक केले होते, त्यानंतर काय झाले सर्वांना माहित आहे.' पायलट पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान मानगड धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करतील अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे त्यांनी घोषणा केली नाही.' 

गहलोत यांच्यावरही बोचरी टीका पायलट यांनी यावेळी गहलोत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'सीएलपीची बैठक 25 सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये होणार होती, परंतु ती होऊ शकली नाही. यासाठी सीएम गेहलोत यांनी पक्षनेतृत्वाची माफीही मागितली आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. काँग्रेस पक्ष हा शिस्त आवडणारा पक्ष आहे, असा संदेश जावा यासाठी कारवाई केली जाईल. नियम आणि कायदे सर्वांसाठी समान आहेत. नोटीस मिळालेल्या तीन नेत्यांनीही आपले उत्तर दिले आहे. आता यावरही बोलून निर्णय होईल. चूक झाली असेल तर ती सुधारण्याची वेळ आहे,' असे पायलट म्हणाले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliticsराजकारणcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे