शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

Rajasthan Political Crisis: 'मी भाजपात जाणार नाही'; सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 3:25 PM

देशात घोडेबाजार सुरु आहे.  20-20 कोटींना आमदारांना खरेदी केलं जात आहे.

जयपूर: राजस्थानमध्ये बंडखोरी करणारे सचिन पायलट  (Sachin Pilot) यांच्यावर काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी नाराजीचं बंड पुकारलं, त्यानंतर काँग्रेसने भाजपावर आरोप करत सरकार अस्थिर करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत असल्याचा आरोप केला आहे. (Rajasthan Political Crisis) मात्र सचिन पायलट यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे.  20-20 कोटींना आमदारांना खरेदी केलं जात आहे. नवी पिढी हे सगळं बघत आहे. भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला आहे.

सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण...

अशोक गहलोत पुढे म्हणाले की, नव्या पीढीवर आमचं प्रेम, येणारे दिवस त्यांचेच आहेत, आमचे सहकारी भाजपाच्या जाळ्यात फसले. भाजपाने कर्नाटक, मध्य प्रदेशसारखा खेळ राजस्थानात रचला असल्याचा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे.

चांगली इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि सुंदर, देखणे दिसणे या सर्व गोष्टी काही उपयोगाच्या नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणं आणि वचनबद्धता काय आहे, कशी आहे, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात असं असं देखील अशोक गहलोत यांनी सांगितले.

तत्पूर्वी, सचिन पायलट एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मी अशोक गहलोत यांच्यावर नाराज नाही किंवा मी जास्त काही मागितलंही नाही. काँग्रेसने राजस्थानमधील जनतेला निवडणुकीवेळी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करावीत इतकीच माझी इच्छा होती. आम्ही वसुंधरा राजे यांच्याविरोधात प्रचार केला होता. अवैध माइनिंग प्रकरणात काँग्रेसचं सरकार आल्यानंतरही काही केले नाही. अशोक गहलोत त्यांच्या मार्गाने चालले होते.

गेल्या वर्षी राजस्थान उच्च न्यायालयाने पूर्वीचा निर्णय बदलून वसुंधरा राजे यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले, परंतु अशोक गहलोत सरकारने हा निर्णय लागू करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. एकीकडे अशोक गहलोत हे माजी मुख्यमंत्र्यांना मदत करत आहेत आणि दुसरीकडे ते मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासात काम करण्याची संधी देत नाहीत. माझ्या आदेशाचे पालन करू नका, फाइल्स माझ्याकडे पाठवू नका असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. काही महिन्यांपासून विधिमंडळ पक्ष किंवा मंत्रिमंडळाची बैठक होत नाही. मी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाही तर अशा पदाचा काय उपयोग, असं सचिन पायलट यांनी सांगितले.

भाजपासोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होता असा आरोप अशोक गहलोत यांनी केला होता. यावर या दाव्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेसला जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, मी पक्षाच्या विरोधात काम का करणार असं सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा