शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:12 IST

पोलिसांनी 'सुफा' संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

रतलाम:जयपूरला(jaipur) साखळी बॉम्बस्फोटांनी हादरवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. राजस्थान पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मध्य प्रदेशातील सुफा संघटनेच्या तीन कट्टरपंथीयांना चित्तोडगडच्या निंबाहेरा येथून अटक केली आहे. त्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य, टायमर आणि 12 किलो आरडीएक्स(RDX) जप्त करण्यात आले आहे.

'सुफा' संघटनेच्या तिघांना अटकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निंबाहेरा येथे बॉम्ब बनवून दुसर्‍या टोळीला देणार होते. ही टोळी हेच बॉम्ब जयपूरमध्ये तीन ठिकाणी ठेवून, नंतर ते टायमरच्या सहय्याने उडवणार होते. हा कट अंमलात आणण्याआधीच पोलिसांनी त्या तिघांना पकडले. हे तिघे देशद्रोहाच्या प्रकरणातील कुख्यात सुफा संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना 2012-13 मध्ये मध्य प्रदेशातील रतलाममध्ये सक्रिय झाली होती. गेली अनेक वर्षे शांत राहिल्यानंतर आता ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाली आहे.

सुफा दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलप्रमाणे काम करतेसुफा ही कट्टरपंथी विचारसरणीच्या 40-45 तरुणांची इस्लामिक संघटना आहे. हे दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलसारखे काम करते. ही संघटना कट्टरतावादी विचारसरणीची पुरस्कर्ते आहे. या संघटनेने मुस्लिम समाजातील विवाह आणि इतर कार्यक्रमांना हिंदू प्रथा म्हणून विरोध केला होता.

आता एटीएसकडून चौकशी होणार दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी उदयपूर आणि जयपूर एटीएसचे पथक बुधवारी संध्याकाळी उशिरा निंबाहेरा येथे पोहोचले. त्यांची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेशची एटीएसही पोहोचणार आहे. उदयपूरचे आयजी हिंगलाज दान यांनी सांगितले की, जुबेर, अल्तमास आणि सरफुद्दीन उर्फ ​​सैफुल्ला अशी आरोपींची नावे आहेत. ते रतलाम येथून पळून निंबाहेराजवळील राणीखेडा येथे राहत होते. राजस्थानमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांच्या माहितीवरून रतलाम येथूनही दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातही RDXचा वापर करण्यात आलामुंबई बॉम्बस्फोटातही RDX(रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सप्लोझिव्ह) वापरण्यात आले होते. हा स्फोटक किती धोकादायक आहे, याचा अंदाज पुलवामा बॉम्बस्फोटावरुन लावता येईल. पुलवामा स्फोटात 60 किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. आरडीएक्सचा स्फोट इतका धोकादायक असतो की, त्याच्या आवारात स्टील आले तरी ते वितळेल. या स्फोटकामध्ये सर्वात मजबूत काँक्रीट आणि स्टीलही क्षणार्धात उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिसBombsस्फोटकेBlastस्फोटjaipur-pcजयपूर