शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

७ वेळा पाकिस्तानला गेला, ISI साठी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला कार्यालयातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:30 IST

राजस्थानमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान त्याने मोठा खुलासा केला आहे.

Pakistani Spy: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असून हेरगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. अशातच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत एका सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. शकूर खान असे या गुप्तहेराचे नाव असून सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. 

ऑपरेशन सिंदूर नंतर गेल्या काही दिवसांत अनेक पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे. आता सीआयडीने पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली राजस्थानमधून शकूर खानला अटक केली आहे. शकूर खान हा मंगलिया जिल्हा रोजगार कार्यालयात लिपिक असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शकूर खान काँग्रेस नेत्याचा माजी स्वीय सहाय्यक आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तानला गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शकूर काही काळापूर्वी विभागाला माहिती न देता पाकिस्तानला गेला होता.  त्याने विभागीय परवानगीशिवाय किमान सहा-सात वेळा पाकिस्तानला प्रवास केल्याचे समोर आलं आहे.

राजस्थानातील जैसलमेर येथील सरकारी कार्यालयातून शकूर खानला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याची विविध यंत्रणांकडून त्याची सतत चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान खानने अनेक खुलासे केले आहेत. चौकशीदरम्यान शकूरने सांगितले की तो गेल्या काही काळात ७ वेळा पाकिस्तानला गेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला भेटी दिल्याचे समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. खान हा काँग्रेस सरकारमधील मंत्री सालेह मोहम्मद यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत होता. सालेह मोहम्मद आणि आरोपी खान दोघेही एकाच गावातील आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, शकूरने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाद्वारे आयएसआयच्या हँडलर्सशी संपर्क साधला आणि संवेदनशील माहिती शेअर केली. त्याच्या फोनमध्ये लष्करी कारवायांशी संबंधित कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ आढळले नाहीत. मात्र खानच्या मोबाईलमध्ये अनेक अज्ञात पाकिस्तानी नंबर सापडले आहेत, ज्याबद्दल त्याने काहीही सांगितलेले नाही. तसेच अनेक फायली डिलिट केल्या आहेत ज्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.

शकूरला ताब्यात घेतल्यानंतर त्याला जयपूरला नेण्यात येत आहे. जैसलमेरचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानच्या संशयास्पद हालचालींची  माहिती वरिष्ठ मुख्यालयाकडून मिळाली होती, त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. गुप्तचर संस्था काही काळापासून त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या कारण त्यांना पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्याशी आणि आयएसआयशी त्याचे संबंध असल्याची माहिती मिळाली होती. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajasthanराजस्थानISIआयएसआय