शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Rajasthan Congress: सचिन पायलट नकोच, गहलोत समर्थक आमदारांनी हायकमांडसमोर ठेवल्या या तीन अटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 09:17 IST

Rajasthan Congress Politics: काँग्रेसच्या आमदारांनी हायकमांडसमोर तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, या अटींवर एकमत होत नाही तोवर कुठलाही आमदार बैठकीला हजर राहणार नाही

जयपूर - अशोक गहलोत यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी चाचपणी सुरू झाली आहे. रविवारी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय होणार होता. त्यासाठी आमदारांची बैठकही बोलावण्यात आली होती. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच एकाएकी काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. मात्र गहलोत यांनी हात वर केले. दरम्यान, अशोक गहलोत यांच्या समर्थकांनी काँग्रेस हायकमांडसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या आमदारांनी हायकमांडसमोर तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, या अटींवर एकमत होत नाही तोवर कुठलाही आमदार बैठकीला हजर राहणार नाही.  

काँग्रेसच्या नाराज असलेल्या आमदारांनी हायकमांडसमोर ठेवलेल्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. - अशोक गहलोत हे अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. म्हणजेच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा ही १८ ऑक्टोबरनंतर करण्यात यावी. - जी व्यक्ती मुख्यमंत्री बनेल ती त्या १०२ आमदारांमधील असेल ज्यांनी २०२० मध्ये सचिन पायलट यांच्या बंडावेळी सरकार कोसळण्यापासून वाचवले होते.- मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गहलोत यांचा पर्याय दिला गेला पाहिजे.

राजस्थान सरकारमधील मंत्री महेश जोशी यांनी सांगितले की, हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर प्रत्येक आमदाराला विश्वास आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. आता हायकमांड अंतिम निर्णय घेताना आमच्या म्हणण्याचा विचार करेल, अशी अपेक्षा आहे. काँग्रेसशी निष्ठावंत असणाऱ्यांची पक्षाने काळजी घ्यावी, असे आम्हाला वाटते. दरम्यान, काही नाराज आमदारांनी सी.पी. जोशी यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे या घटनाक्रमांची सोनिया गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आमदारांशी समोरासमोर चर्चा करण्याची सूचना अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना दिली आहे. तसेच अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीत बोलावून घेतलं आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतSonia Gandhiसोनिया गांधीSachin Pilotसचिन पायलट