मुख्यमंत्र्यांनी तीन तासांत ऐकल्या 5000 लोकांच्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:14 PM2019-09-23T16:14:33+5:302019-09-23T16:17:36+5:30

विविध कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

rajasthan chief minister ashok gehlot listened to 5000 peoples problem in 3 hours | मुख्यमंत्र्यांनी तीन तासांत ऐकल्या 5000 लोकांच्या समस्या

मुख्यमंत्र्यांनी तीन तासांत ऐकल्या 5000 लोकांच्या समस्या

Next

जयपूर : राजस्थाने मुख्यमंत्रीअशोक गहलोत यांनी आपल्या निवासस्थानी झालेल्या जनसुनावणीवेळी राज्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी जवळपास तीन तासांत 5000 नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. अशोक गहलोत यांना भेटण्यासाठी पार्टीने नेता आणि कार्यकर्ते सुद्धा सामील होते. याशिवाय, संस्था आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटांवर दावेदारी करणारे नेतेमंडळी सुद्धा उपस्थित होते.

हनुमानगड जिल्ह्यातील संगरिया नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रियंका महेंद्र गोदारा यांनी अशोक गहलोत यांनी भेट घेऊन नरगपालिका अध्यक्ष नाथुराम सोनी यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. संजीवनी क्रेडिट सोसायटी बनावट प्रकरणी सुद्धा पीडितांकडून देण्यात आलेल्या निवेदनात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचबरोबर, विविध कर्मचारी संघटनांनी अशोक गहलोत यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या आणि समस्या अशोक गहलोत यांच्यासमोर मांडल्या. तसेच, अशोक गहलोत यांना भेटण्यासाठी आलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे. 

राजस्थान: मुख्यमंत्री अशोक गहलोत ने 3 घंटे में सुनी 5000 लोगों की समस्याएं

दरम्यान, गेल्या सोमवारी अशोक गलहोत यांच्या निवासस्थानी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी अशोक गहलोत यांनी हातोडी क्षेत्रात आलेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे सोमवारी होणारी जनसुनावणी रद्द करण्यात आली होती. यामुळे ही जनसुनावणी आज घेण्यात आल्यामुळे मोठ्याप्रमाणात नागरिक आले होते.
 

Web Title: rajasthan chief minister ashok gehlot listened to 5000 peoples problem in 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.