शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Rajasthan Assembly Election Results: राज्यात बंडोबांचा पूर; काँग्रेस-भाजपा सत्तेपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 13:55 IST

बंडखोरांमुळे दोन्ही पक्षांना मोठा फटका

जयपूर: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही वेळापूर्वी काँग्रेस पक्ष 100 हून अधिक जागांवर आघाडीवर होता. मात्र त्यानंतर काँग्रेसची काही जागांवरील आघाडी कमी झाली. तर भाजपा जवळपास 85 मतदारसंघात आघाडीवर आहे. काँग्रेस आणि भाजपाला या निवडणुकीत बंडखोरांनी दणका दिला आहे. दोन्ही पक्षांमधील जवळपास 50 नेत्यांनी बंडाचा झेंडा उभारला. पक्षातून फुटलेले हेच नेते सध्या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. राजस्थानातील अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट मुकाबला होतो. मात्र बंडखोरांमुळे यावेळी तिरंगी सामना पाहायला मिळतो आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. यापैकी जवळपास 5 डझन जागांवर यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तर डझनभर जागांवर चौरंगी सामना पाहायला मिळतो आहे. निवडणुकीच्या तोंडावर हनुमान बेनीवाल यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष स्थापन केला. या पक्षानं मारवाड आणि शेखावटी भागात जाट समाजाची मतं घेत भाजपाला धक्का दिला आहे.सत्ताधारी भाजपानं यावेळी जवळपास 70 आमदारांची तिकीटं कापली. त्यामुळे अनेकजण नाराज झाले. यातील अनेकांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आलं. मात्र काहीजणांनी बंडांचा झेंडा उभारला. वसुंधरांच्या मंत्रिमंडळातील सुरेंद्र गोयल यांनी जैतारणावरुन, राजकुमार रिणवा यांनी रतनगढमधून, ओमप्रकाश हुडला यांनी महुवामधून आणि धनसिंह रावत यांनी बांसावाडामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. तर आमदार अनिता कटारा यांनी सागवाडामधून, देवेंद्र कटारा यांनी डुंगरपूरहून, नवनीत लाल निनामा यांनी घाटोलहून, किशनाराम नाई यांनी श्रीडूंगरगढमधून आणि गीता वर्मा यांनी सिकरायमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.  राज्यात सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसलादेखील बंडखोरांनी दणका दिला. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताधारी पक्ष बदलतो. त्यामुळे काँग्रेसमधील अनेकजण तिकीटासाठी उत्सुक होते. त्यामुळेच तिकीटं जाहीर होताच बंडखोरी झाली. माजी केंद्रीय मंत्री महादेव सिंह खंडेला यांनी खंडेलामधून, माजी मंत्री बाबुलाल नागर यांनी दूदूमधून, माजी मंत्री रामकेश मीणा यांनी गंगापूर सिटीमधून, माजी आमदार संजय लोढा यांनी सिरोहीतून, माजी उपमुख्यमंत्री कमला बेनीवाल यांचे पुत्र आलोक बेनीवाल यांनी शाहपूरमधून आणि विक्रम सिंह शेखावत यांनी जयपूरमधील विद्याधर नगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा