शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Assembly Election: दुखावलेल्या राजपुतांसाठी भाजपाचा 'राम'बाण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 15:00 IST

राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणूकभाजपासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या राज्यातील भाजपाची सत्ता जाणार असल्याचं भाकित अनेक सर्वेक्षणांमधून वर्तवण्यात आलं आहे. राज्यातील प्रभावी असलेले राजपूत सध्या भाजपाविरोधात जाताना दिसत आहेत. त्यामुळे आता भाजपानं राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी 'राम' बाण बाहेर काढला आहे. राजस्थानात राजपूत समुदाय अतिशय प्रभावी समजला जातो. एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास, राजपुतांचं प्रमाण 12 टक्के इतकं आहे. जवळपास दोन ते तीन डझन विधानसभा मतदारसंघांमध्ये राजपूतांची मतं निर्णायक ठरु शकतात. वसुंधरा राजे यांच्या कॅबिनेटमध्ये राजपूत समाजाचे तीन आमदार आहेत. तर एकाला राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र सध्या राजपूत भाजपावर नाराज आहेत. राजमहल जमीन वाद, पद्मावत चित्रपटाचा वाद, गँगस्टर आनंदपाल सिंहचा एन्काऊंटर, गजेंद्र सिंह शेखावत यांना वसुंधरा राजे यांच्याकडून होणारा विरोध यामुळे राजपुतांच्या मनात नाराजीची भावना आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राजपूत नेते जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजपूत समाजाची वाढती नाराजी भाजपाला महागात पडू शकते. त्यामुळे आता भाजपानं 'राम'नामाचा आधार घेण्यास सुरुवात केली. राजपूत समुदायाची संघटना असलेल्या करणी सेनेचे लोकेंद्र सिंह कालवी काल अयोध्येला गेले होते. राम क्षत्रिय होते. त्यामुळे आम्ही रामाचे वंशज आहोत, असं कालवी यांनी म्हटलं. यावेळी कालवी यांनी रामजन्मभूमीचं दर्शन घेतलं. जेव्हा रामाचं भव्य मंदिर उभारण्यात येईल, तेव्हाच अयोध्येला येऊ अशी शपथ त्यांनी घेतली. त्यामुळे आता भाजपाला राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी 'राम'बाण उपाय सापडला आहे. रामनामाच्या मदतीनं राजपुतांना खूश करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह