शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे; अमित शहा बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 15:39 IST

घोटाळ्यांच्या आरोपांवरुन अमित शहांची घणाघाती टीका

प्रतापगढ: राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा काँग्रेसवर बरसले आहेत. काँग्रेसनं फक्त जमिनीवरच नव्हे, तर पंचमहाभूतांवरही घोटाळे केले, अशी घणाघाती टीका शहा यांनी केली. काँग्रेस सत्तेत असताना आकाश, अवकाश, जमीन, समुद्र आणि पाताळात घोटाळे झाले, असं शहा म्हणाले. ते प्रतापगढमध्ये एका जनसभेला संबोधित करत होते. काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शहांनी केला. 'जगात पंचमहाभूतं आहेत. आकाश, अवकाश, जमीन, समुद्र आणि पाताळ यांचा पंचमहाभूतांमध्ये समावेश असतो. काँग्रेसनं अवकाशात इस्रो आणि 2जी घोटाळे केले. आकाशात वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा केला. जमिनीवर आदर्श सोसायटी, समुद्रात पाणबुड्या आणि जमिनीखाली (पाताळात) कोळसा घोटाळा केला,' अशी टीका शहांनी केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. 'राहुल बाबा जोरजोरात बोलत होते की, मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसचं सरकार येईल. राहुल बाबा, स्वप्न पाहणं चांगलं असतं. मात्र दिवसा स्वप्न पाहणं चांगलं नसतं,' असा टोला त्यांना लगावला. दहा वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनं राजस्थानला काय दिलं, असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला. काँग्रेसनं आदिवासी समाजासाठी काहीच केलं नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं पहिल्यांदाच आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना केली. मोदी आणि वसुंधरा राजे यांनी आदिवासी समाजाला सशक्त करण्याचं काम केलं, असं शहा म्हणाले. राहुल गांधींकडे सध्या 'मोदी हटाओ'शिवाय कोणताही कार्यक्रम नाही. त्यांना मोदी फोबिया झाला आहे, असा चिमटा त्यांनी काढला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी