शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूचे आणखी ११ बळी, मृत्यूसंख्या १५३ वर

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.
जयपूर आणि जोधपूर येथे रविवारी प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर अजमेर येथे दोन जण आणि नागौर, भरतपूर व कोटा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरली आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूची लागण झालेले २१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जयपूर जिल्ह्यात सर्वाधिक २६ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
लखनौमध्ये आढळले सात नवे रुग्ण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शनिवारी आणखी सात जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. सध्या लखनौमधील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूचे ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
५५०० कोटींचे नुकसान
महाराष्ट्र, राजस्थान आणि देशाच्या अन्य काही भागांत पसरलेल्या स्वाईन फ्लूमुळे पर्यटन आणि नागरी उड्डयण क्षेत्राचे किमान ५,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू पसरल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. हिवाळ्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये येत असत. परंतु आता या दोन्ही राज्यांमध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. (वृत्तसंस्था)