रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 04:46 IST2018-08-13T04:45:42+5:302018-08-13T04:46:02+5:30

रेल्वे राज्यमंत्री व भाजपचे खासदार राजन गोहेन यांच्यावर आसाम पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

Rajan Gohain news | रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या

रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या

- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली - रेल्वे राज्यमंत्री व भाजपचे खासदार राजन गोहेन यांच्यावर आसाम पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. याबाबत भाजप तपास अहवालाची प्रतीक्षा करीत आहे तर स्वत: गोहेन यांनी आरोपांचा स्पष्ट इन्कार केला असूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
आसामच्या नौगाव मतदारसंघातून गोहेन लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा व धमकावल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजमाध्यमांतून गोहेन यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. विरोधी पक्षांसोबत सामान्य नागरिकही गोहेन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारलाही झोडपून काढत आहेत. गोहेन प्रकरणाची तुलना उत्तर प्रदेशातील बलात्कार घटनेशी केली जात आहे. त्यातील आरोपी भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर असेच आरोप आहेत. भाजप सेंगर यांना वाचवायच्या प्रयत्नांत आहे तसाच प्रयत्न गोहेन यांच्यासाठीही होत असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Rajan Gohain news