शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:58 IST

Raj Kushwaha And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी राज कुशवाहच्या आजीचा मृत्यू झाला आहे.

राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी राज कुशवाहच्या आजीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांची नावे समोर आल्यानंतर आजी रामलली यांची प्रकृती बिघडली होती. या धक्क्यानेच मृत्यू झाल्याचं राजच्या कुटुंबाने म्हटलं आहे. रामलली या उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरातील रामपूर सुकेती येथील रहिवासी होत्या.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नातवाचं नाव समोर आल्यानंतर आजीने सांगितलं होतं की, सोनमला लग्न करायचं नव्हतं. तिने तिच्या नवऱ्याला खाल्लं आणि राजला देखील खाण्याचा प्रयत्न करत आहे. राज कुशवाहच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, राज निर्दोष आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, राज कुशवाह त्याच्या वडिलांसोबत इंदूरमधील फळ बाजारात राहत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर राज इंदूरमधील सोनम रघुवंशीच्या कारखान्यात काम करू लागला.

"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

 "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन

मेघालय पोलिसांचं तपास पथक बुधवारी (१८ जून) इंदूर येथील मुख्य आरोपी सोनमच्या घरी पोहोचलं. सोनमच्या कुटुंबाची चौकशी केली. राजा रघुवंशीच्या कुटुंबाने हत्येचे संपूर्ण सत्य बाहेर काढण्यासाठी सोनमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. राजा रघुवंशीच्या कुटुंबाने सोनमच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राजाच्या कुटुंबाचा आरोप आहे की, सोनमच्या कुटुंबाने काही दिवसांत इतके पैसे कुठून कमावले? कुटुंबाने इतके पैसे कमावले की, नातेवाईकांच्या नावावर खाती उघडली गेली आहेत. 

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती

सोनमने आरोपी राज कुशवाहच्या आईच्या नावावरही बँक खातं सुरू केलं होतं. सोनमचे वडील इंदूरमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पीठ गिरणीचा म्हणजेच चक्कीचा व्यवसाय सुरू केला.सोनमच्या कुटुंबाने नंतर प्लायवुड व्यवसायात पाऊल ठेवलं आणि कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केलं. आता या कुटुंबावर हवाला व्यवसायाचा आरोप होत आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस