शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:49 IST

इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येचा तपास केल्यानंतर मेघालय पोलिसांच्या एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येचा तपास केल्यानंतर मेघालय पोलिसांच्या एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी सोहरा उपविभागाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ७९० पानांचे आरोपपत्र सादर केले. या प्रकरणात राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि त्यांचे सहकारी आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल सिंह चौहान यांना आधीच अटक करण्यात आली आहे.

सध्या हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम आणि राज यांनी राजाला मारण्याचा कट रचला होता, ज्यात इतर तीन आरोपींनी मदत केली होती. या सर्वांवर खून (कलम १०३(१) बीएनएस), पुरावे नष्ट करणे (कलम २३८(अ) बीएनएस) आणि गुन्हेगारी कट (कलम ६१(२) बीएनएस) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सायम म्हणाले की, अतिरिक्त फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होताच या प्रकरणातील आणखी तीन सह-आरोपींविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले जाईल.

राजा रघुवंशी प्रकरणाने देशभरात खळबळप्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स, लोकेंद्र तोमर (सोनम हत्येनंतर जिथे लपली होती त्या इमारतीचे मालक) आणि बलबीर अहिरवार (सुरक्षा रक्षक) हे तिघेही सह-आरोपी आहेत. या तिघांनाही पुरावे नष्ट करणे आणि लपवणे या आरोपाखाली यापूर्वी अटक करण्यात आली होती, परंतु सध्या ते जामिनावर आहेत. लग्नानंतर राजा रघुवंशी यांची हनिमून ट्रिप दरम्यान हत्या झाल्याने या हाय-प्रोफाइल खून प्रकरणाने देशभरात लोकांना धक्का बसला होता. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर, आता न्यायालयात सुनावणीची प्रक्रिया वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

विद्रूप अवस्थेत आढळलेला राजाचा मृतदेह!इंदूरचे व्यापारी राजा रघुवंशी यांचे या वर्षी ११ मे रोजी सोनमशी लग्न झाले होते. २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. त्यानंतर तीन दिवसांनी दोघेही बेपत्ता झाल्याची बातमी आली. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. सोहरा येथील वेसाडोंग धबधब्याजवळील दरीत मृतदेह आढळला. सोनम रघुवंशीने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी या तीन जणांच्या मदतीने राजाला ठार मारले. मेघालय एसआयटीच्या तपासात हा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू