राज बब्बर यांनी दिला यूपी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:51 IST2018-03-21T09:14:40+5:302018-03-21T09:51:43+5:30

उत्तरप्रदेश राज्याच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे

Raj Babbar resigns as UP Congress President | राज बब्बर यांनी दिला यूपी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

राज बब्बर यांनी दिला यूपी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

लखनऊ - उत्तरप्रदेश राज्याच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेश मधील नव्या चेहऱ्याला किंवा युवा काँग्रेस उमेदवाराला राज्याचे अध्यक्षपद मिळण्याची शक्याता आहे.  माध्यमांच्या वृत्तानुसार, काल रात्री उशीरा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. राज बब्बरकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  तर उत्तरप्रदेश काँग्रेसने यावर प्रतिक्रिया देणं टाळले. 

दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महाधिवेशनामधील राहुल गांधींच्या भाषणानंतर त्यांनी ट्विट करत राहुल गांधींचे कौतुक केले होते. तर विरोधकांवर टीका केली होती.  'आसमान का रंग बदल रहा है..सत्ता पक्ष की नींव हिल चुकी है' असे ट्विच राज बब्बर यांनी केले होते.  दोन दिवसांमध्ये असं काय झालं की राज बब्बर यांनी राज्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. असा प्रश्न उपस्थित होतो. 



 

Web Title: Raj Babbar resigns as UP Congress President