शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

...म्हणून भाजपाच्या कार्यक्रमाला हेल्मेट घालून गेले पत्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:57 PM

छत्तीसगडच्या रायपूरमधील प्रकार 

रायपूर: छत्तीसगडमधील पत्रकारांनी भाजपा नेत्यांना हेल्मेट घालून प्रश्न विचारले. हातात माईक आणि डोक्यावर हेल्मेट अशा अवतारात पत्रकारांनी भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. भाजपा नेत्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकाराला मारहाण केली होती. त्याचा पत्रकारांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केला. भाजपा नेत्यांना योग्य तो संदेश देण्यासाठी हेल्मेट घालून भाजपाच्या कार्यक्रमांचं वार्तांकन करत असल्याचं काही पत्रकारांनी सांगितलं. भाजपा नेत्यांनी पुन्हा हल्ला केल्यास हेल्मेट कामी येईल, अशी भावना काहींनी व्यक्त केली. शनिवारी पत्रकार सुमन पांडे यांना भाजपा नेत्यांनी मारहाण केली. 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपानं बैठक बोलावली होती. त्यामध्ये भाजपा नेत्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचं चित्रीकरण करत असताना भाजपा नेत्यांनी मारहाण केली,' असं पांडे यांनी सांगितलं. 'भाजपा नेत्यांच्या आढावा बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी मी गेलो होतो. तिथे रायपूर भाजपाच्या अध्यक्षांसह अन्य काही नेते उपस्थित होते. तेव्हा तिथे अचानक काही नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ती चित्रीत करत असताना उत्कर्ष त्रिवेदी आणि राजीव अग्रवाल यांनी मला मारहाण केली. त्यांनी माझा फोन काढून घेतला आणि चित्रफित डिलीट केली. यानंतर 20 मिनिटं मला एका खोलीत ठेवण्यात आलं,' असं पांडे म्हणाले. या प्रकरणाची माहिती पत्रकारांनी पोलिसांना दिली. त्यानंतर भाजपाच्या चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. राजीव अग्रवाल, विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी आणि डिना डोगरे अशी अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. या प्रकरणी भाजपा प्रवक्ते सच्चिदानंद उपासने यांनी सुमन पांडे यांची माफी मागितली. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाreporterवार्ताहर