शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:12 IST

IMD Weather Alert: सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य संकटात सापडले आहेत, अशा परिस्थितीत आता भारतीय हवामान खात्याने आणखी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर या पावसामुळे गेल्या ५० वर्षांतील रेकॉर्ड तुटू शकतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात एवढा पाऊस पडत नाही.

सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंवण्यात आला आहे. आता ऑक्टोबर महिन्यात देशातील गेल्या ५० वर्षांच्या इतिहासातील पावसाचा रेकॉर्ड टुटू शकतो. भारतात सप्टेंबर महिन्यात मान्सूनची तिव्रता कमी होते. मात्र यावेळी मान्सून अधिक सक्रिय राहिला. तसेच अजुनही काही भागात आर्द्रता आहे. त्या आर्द्रतेमुळे ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.  असेही महापात्रा यांनी सांगितले.

दरम्यान, या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रकरणात नुकसान होऊ शकतो. ऑक्टोबर महिना हा पिकांच्या कापणीचा हंगाम असतो. अशा वेळी पाऊस पडला तर पिकांचं नुकसान होतं. तसेच या पावसामुळे भात, मका, सोयाबीन या पिकांचं खूप नुकसान होऊ शकतं. याशिवाय शेतामध्ये पाणी साचल्यानेही पिके कुजण्याची शक्यता आहे.  . 

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy October Rains Predicted: Weather Department Issues Stark Warning

Web Summary : Following September floods, the weather department forecasts heavy October rainfall across India, potentially breaking 50-year records. This threatens significant crop damage, especially to rice, maize, and soybean, during the crucial harvest season.
टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजIndiaभारत