शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
3
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
4
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
5
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
6
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
7
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
8
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
9
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
10
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
11
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
12
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
13
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
14
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
15
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
16
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
17
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
18
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
19
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
20
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 

पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 13:23 IST

मलब्यामुळे रस्ते बंद झाले असून, प्रशासनाने आपत्कालीन सेवांसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब केला आहे...

मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक येथे भूस्खलनामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्ता आहे. मिरिक आणि कुर्सियांगला जोडणारा दुदिया आयर्न ब्रिज कोसळला असून, सिलीगुडी-दार्जिलिंग राज्य महामार्ग-12 वर वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 110 वरील हुसैन खोला येथेही भूस्खलनामुळे सिलीगुडी आणि दार्जिलिंगमधील संपर्क तुटला आहे. मलब्यामुळे रस्ते बंद झाले असून, प्रशासनाने आपत्कालीन सेवांसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब केला आहे.

दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे, परंतु सततचा पाऊस आणि निसरड्या रस्त्यांमुळे अडथळे येत आहेत. प्रशासनाने लोकांना डोंगराळ मार्ग आणि नदीकाठांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. राजगंजमधील पोराझार येथे महानंदा नदीवरील बंधारा तुटल्याने अनेक घरे आणि शेती पाण्याखाली गेली आहे, यामुळे रहिवाशांना स्थलांतर करावे लागले आहे.

हवामान विभागाचा रेड अलर्ट -भारतीय हवामान विभागाने (IMD) दार्जिलिंग, कलिम्पोग, कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तीस्ता आणि माल नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, मालबाजार आणि डुआर्समध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पर्यटन स्थळांचे नुकसानमिरिक आणि कुर्सियांगसारख्या पर्यटन स्थळांना मोठा फटका बसला आहे. गावांमधील घरे मलब्याखाली गाडली गेली असून, रस्त्यांवर चिखल आणि दगडांचा खच पडला आहे. प्रशासनाने अनेक गावे रिकामी करून लोकांना तात्पुरत्या निवारा शिबिरांमध्ये हलवले आहे.

शुभेंदु अधिकारी यांचे आवाहनपश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी एक्सवर म्हटले आहे की, दार्जिलिंग, कालिम्पॉंग आणि कुर्सियांगमधील डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. भूस्खलन आणि पुरामुळे सिलीगुडी, तराई आणि डुआर्समधील संपर्क तुटला आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे तातडीने मदत पथके आणि रस्ते पुनर्बांधणीला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, झारखंडचा पश्चिमेकडूल भाग, दक्षिण बिहार आणि दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेशातही पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुर्शिदाबाद, बीरभूम आणि नदिया जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज आहे. बांकुरा येथे 24 तासांत 65.8 मिमी पावसाची नोंद झाली. प्रशासनाने शाळा बंद ठेवल्या असून खालच्या भागांत अलर्ट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal Rain Havoc: Bridge Collapse, 6 Dead in Darjeeling

Web Summary : Heavy rains in West Bengal caused landslides in Darjeeling, killing six. A bridge collapsed, disrupting traffic. The IMD issued a red alert for several districts due to potential flooding. Evacuations are underway, and opposition leaders are seeking aid.
टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यू