विदर्भ वगळता राज्यात पाऊस ओसरला
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:20+5:302015-09-01T21:38:20+5:30
पुणे : विदर्भात अनेक भागात पाऊस पडत असून राज्याच्या इतर भागात मात्र पाऊसाने पाठ फिरवली आहे. मंगळवारी दिवसभरात विदर्भात गोंदिया येथे ५९ मिमी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील काही भागातही जोरदार पाऊस झाला.

विदर्भ वगळता राज्यात पाऊस ओसरला
प णे : विदर्भात अनेक भागात पाऊस पडत असून राज्याच्या इतर भागात मात्र पाऊसाने पाठ फिरवली आहे. मंगळवारी दिवसभरात विदर्भात गोंदिया येथे ५९ मिमी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील काही भागातही जोरदार पाऊस झाला. काही दिवसांपासून विदर्भात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने स्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. विदर्भात अजूनही अनेक भागात पाऊस सुरू आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र पावसाने पुर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात गोंदिया येथे सर्वाधिक ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे. मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भात कळमेश्वर येथे १६० मिमी, मोहाडीफाटा येथे ९०, ब्रम्हपुरी येथे ७०, भामरागड, चामोर्शी येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच इतर काही भागातही चांगला पाऊस झाला. पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ----------