शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस.... एक

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नांद

नांद
परिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजता प्रचंड विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगाम बुडालेल्या शेतकऱ्यांची अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे पुन्हा झोप उडाली आहे.
परिसरात शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, हळद, लाख आदी पिके आहेत. परंतु या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गव्हाचे पीक परिपक्व होऊन कापणीच्या अवस्थेत होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे गहू पीक लोटल्या गेले. येथील शेतकरी पांडुरंग तिमांडे, श्यामराव खानोरकर, प्रभाकर दांडेकर यांच्या शेतीतील गहू, तूर या पिकांची प्रचंड नासाडी झाली. या वादळी पावसामुळे परिसरातील ४०० ते ५०० क्विंटल गव्हाचे व इतर मालाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज काहींनी वर्तविला आहे. कृषी व महसूल विभागाने परिसरातील पिकांच्या नुकसानीबाबत सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी व इतर पिके वाया गेली. त्यामुळे शेतकरी हतबल होता. त्यातच पुन्हा या वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खात
मौदा तालुक्यातील खात परिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसल्याने गहू, हरभरा या रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गव्हाच्या लोंब्या परिपक्व होत असतानाच पीक जमिनीवर लोटले. हरभऱ्याचीही हीच अवस्था झाली. याचा उत्पादन व गुणवत्तेवर विपरित परिणाम होणार असून शेतकऱ्यांना खरीपाप्रमाणेच रबीतही मोठी आर्थिक झळ बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे भातगिरण्यांच्या आवारात ठेवलेली हजारो धानाची पोती ओली झाली. वीटभट्ट्यांचेही प्रचंड नुकसान झाले.
नागरिक पहाटेच्या साखरझोपेत असल्याने ते घराबाहेर असलेल्या वस्तंूचा पावसापासून बचाव करू शकले नाही. तोंडली येथे राजू शेंडे यांच्या शेतात वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे काही काळ वीज पुरवठा बंद होता. अरोली वीज वितरण उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मुत्तेपवार यांनी कर्मचाऱ्यांसह पहाटेपासून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. शासनाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.