शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस.. इंट्रो

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

जिल्‘ात वादळी पावसाचा फटका

जिल्ह्यात वादळी पावसाचा फटका
रबी पिकांचे नुकसान : काही ठिकाणी दमदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडित
नागपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांत बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाच्या सरी कोसळल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही गावात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्यामुळे अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पिकांचे नुकसान वगळता जिल्ह्यात इतर कोणत्याही हानीबाबत वृत्त नाही.
कळमेश्वर, भिवापूर, मौदा, उमरेड, रामटेक या तालुक्यातील अनेक गावामध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास सोसाट्याच्या वादळासह पावसाला सुरुवात झाली. मौदा तालुक्यातील कोदामेंढी, खात, तारसा या परिसरात प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. रामटेक तालुक्यातील देवलापार, करवाही परिसरात दमदार पाऊस कोसळला. भिवापूर तालुक्यातील अनेक गावात पावासाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे मिरचीची सातरे भिजल्याने मिरची उत्पादकांचे नुकसान झाले आहे. नांद परिसरात प्रचंड वादळी पावसामुळे गहू, हरभरा, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले. पारशिवनी तालुक्यात तुरळक पाऊस कोसळला. तसेच कळमेश्वर तालुक्यातील मोहपा, कन्याडोल, परसोडी, कोपर्डा या गावांमध्ये जोरदार वादळी पाऊस कोसळल्याने रबी पिकांचे नुकसान झाले. धामणा परिसरात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. काटोल व नरखेड तालुक्यात सावरगाव, लोहारीसावंगा परिसर वगळता इतर ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या नाही.